फोटो सौजन्य - Social Media
जेव्हा केव्हा आपण वाहन खरेदी करण्याचा विचार करतो. तेव्हा आपल्या मनात Bike की Maxy Scooter ? असा प्रश्न नेहमी येतो. अनेकांना असा प्रश्न पडतो आणि लोकांचा गोंधळ उडतो. पण यामागे गोंधळ उडण्याचा काहीच कारण नाही. कारण आपल्या सोयी पाहून आपण आपला निर्णय घेऊ शकतो. Bike आणि Maxy Scooter दोघेही उत्तम पर्याय आहेत. पण आपल्याला आपल्या वाहनांकडून काय हवंय? याचे उत्तर आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहचवते.
Look पहिला गेलात तर Bike मध्ये विविध प्रकार आहेत. काही Sporty Look देतात तर काही साधा! परंतु, वेग आणि Pickup च्या मुद्द्यात बाईक अव्वल ठरते. पण असे नाही की Maxy Scooter मागे आहे. Maxy Scooter ही दिसण्यात विशेष असतात. बाजारात आलेल्या नव्या Maxy Scooter लुकच्या मुद्द्यात फार अग्रेसर आहे. अतिशय मॉडर्न लुक असणाऱ्या या Maxy Scooter पावरफुल परफॉर्मन्सही देतात.
जर तुम्ही वाहनामध्ये आरामदायीपणा पाहत असाल तर Maxy Scooter योग्य पर्याय आहे. येथे तुम्हाला पसरण्यासाठी जागा तर आहेच त्याचबरोबर सामान ठेवण्यासाठी ही मोठी जागा आहे. ही जागा बाईकमध्ये दिसून येत नाही. घरच्या आणि दैनंदिन वापरासाठी Maxy Scooter बेस्ट आहे, कारण यामध्ये स्टोरेज खूप आहे. सीटखाली तसेच समोरच्या बाजूला मोठी जागा दिली जाते, जी बाइकमध्ये नसते.
Bike चे पोषण करणे Maxy Scooter च्या तुलनेने कमी आहे. अर्थात, Bike ही Maxy Scooter च्या तुलनेत कमी खर्चिक असते. बाईक मायलेजही जास्त देते आणि इतर मेंटेनन्स खर्चही जास्त नसतो. Maxy Scooter किमतीने बाईकपेक्षा महाग असतात. पण यात आरामदायीपणा मिळतो आणि मोठी जागा मिळते. जर तुम्हाला आराम हवा असेल तर Maxy स्कूटर योग्य पर्याय आहे. पण वेग हवा असल्यास Bike उत्तम पर्याय आहे.