फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक जण दुचाकी चालवत असतात. आज दुचाकी हे फक्त या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन नसून एक गरज बनली आहे. आज अनेक जण दुचाकी चालवून थोडी फार कमाई करत असतात. गेल्या काही महिन्यात भारत अनेक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. परंतु जर तुम्ही नववर्षात बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
अनेक जण असे विचार करतात की नववर्षात दुचाकींवर चांगली सूट मिळेल. परंतु आज आपण अशा एका बाईकबद्दल जाणून घेणार आहोत जिची किंमत येत्या नवीन वर्षात वाढणार आहे. त्यामुळेच ही बाईक डिसेंबरच्या महिन्यातच खरेदी करणे उत्तम राहील.
2024 संपण्याअगोदर ‘या’ कंपनीच्या दमदार कार्स मार्केटमध्ये होणार लाँच
आता नवीन वर्षासाठी फक्त एक महिना शिल्लक आहे. नवीन वर्षाच्या आगमनाने केवळ तारीखच बदलत नाही, तर अनेक गोष्टीही बदलतात. त्याच वेळी, अनेक वाहन निर्माते त्यांच्या पॉलिसी देखील बदलताना दिसतात. या अपडेटेड पॉलिसीनुसार, काही वाहनं महाग होतात तर काही स्वस्त. दरम्यान, BMW 1 जानेवारीपासून आपल्या बाईकच्या किंमती वाढवणार आहे. यानुसार BMW Motorrad India देखील सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहे. बाईकच्या किंमतीत 2.5 टक्क्यांची वाढ होणार आहे.
भारतात फक्त BMW कारच नाही तर बाईक देखील खूप लोकप्रिय आहेत. लोक बीएमडब्ल्यू स्कूटरलाही पसंती देत आहेत. आता येत्या १ जानेवारीपासून BMW Motorrad आपल्या सर्व दुचाकींच्या किमती वाढवणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की इनपुट कॉस्ट आणि महागाईच्या वाढत्या दबावामुळे ते सर्व रेंजमधील मोटरसायकलच्या किंमती वाढवणार आहेत. BMW Motorrad, BMW समूहाची उपकंपनी, एप्रिल 2017 मध्ये भारतात आपला व्यवसाय सुरू केला होता. तेव्हापासून बीएमडब्ल्यूच्या बाईक्स आणि स्कूटर्सचा भारतीय बाजारपेठेत समावेश झाला आहे.
BMW Motorrad ची देशात 27 मॉडेल्स आहेत. या मॉडेल्समध्ये 24 मोटारसायकल आणि तीन स्कूटरचा समावेश आहे. या तीन स्कूटरच्या लिस्टमध्ये CE 02, CE 04 आणि C 400 GT यांचा समावेश आहे. यामध्ये BMW CE 04 ही देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरनंतर CE 02 लाँच करण्यात आली, जी 5 लाख रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात आणली गेली आहे.
BMW च्या सर्वात स्वस्त बाईकबद्दल बोलायचे तर TVS सह बनवलेली G 310 R ही ऑटोमेकर्सची सर्वात स्वस्त बाईक आहे. या मोटरसायकलची किंमत 2.90 लाख रुपयांपासून सुरू होते. BMW ची देशातील सर्वात महागडी बाईक M 1000 RR आहे. या बाईकची किंमत सुमारे 55 लाख रुपये आहे.