(फोटो सौजन्य-AI एआय)
बीएमडब्ल्यू मोटोराडने आपल्या नवीन BMW F 450 RR या फुली फेअर्ड स्पोर्ट्सबाइकचे ग्लोबल पदार्पण केले आहे. ही बाइक येत्या काही दिवसांत भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. BMW F 450 RR सीरिजमधील ही तिसरी मोटरसायकल असून, याआधी एफ 450 जीएस अॅडव्हेंचर आणि एफ 450 आर नेकेड बाइक सादर करण्यात आल्या आहेत. भारतीय मार्केटमध्ये या बाइकची स्पर्धा एप्रिलिया आरएस 457, कावासाकी निन्जा 500 आणि केटीएम आरसी 390 यांच्याशी होईल.
बीएमडब्ल्यू एस 1000 आरआरपासून प्रेरित डिझाइन
नवीन एफ 450 आरआरच्या डिझाइनमध्ये BMW F 450 RR या सुपरस्पोर्ट्स बाइकची झलक दिसते. पुढच्या बाजूला खाली झुकणारा लूक, उंचावलेला मागचा भाग, स्पोर्टी फेअरिंग पॅनल्स, क्लिप-ऑन हँडलबार आणि आकर्षक एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यामध्ये सिग्नेचर आरआर डे-टाइम रनिंग लाइट्सदेखील आहेत. डिझाइन वगळता या बाइकचे इंजिन, प्लॅटफॉर्म आणि अनेक फीचर्स एफ 450 जीएसशी मिळतेजुळते आहेत.
420cc इंजिन आणि दमदार परफॉर्मन्स
या स्पोर्ट्सबाइकमध्ये 420cc क्षमतेचे ट्विन-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 47 bhp पॉवर आणि 6,750 rpm वर 43 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीच्या मते, कमी व्हीलबेसमुळे बाइकला वेगवान वळणांवर चांगली चपळता आणि स्थिरता मिळण्यास मदत होते.
BMW ची 603 HP बुलेटप्रूफ लक्झरी कार! 9mm गोळ्यांपासून संरक्षण, प्लग-इन हायब्रिड इंजिनचा दम
आधुनिक फीचर्स आणि सेफ्टी टेक्नोलॉजी
BMW F 450 RR मध्ये 6.5-इंच TFT डिस्प्ले, ऑल-एलईडी लाइटिंग आणि ABS Pro यांसारखी फीचर्स आहेत. याशिवाय डायनॅमिक ब्रेक कंट्रोल, डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल आणि इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल देण्यात आले आहेत. रेन, रोड आणि रेस असे 3 रायडिंग मोड्स स्टँडर्ड मिळतात. कंपनीचे Easy Ride Clutch आणि Shift Assistant Pro गिअर बदलताना क्लचचा मॅन्युअल वापर कमी करण्यासाठी मदत करतात.
भारतातच होणार प्रोडक्शन
या बाइकचे प्रोडक्शन तामिळनाडूमधील होसूर येथे टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रोडक्शन प्लांटमध्ये केले जाणार आहे. बाइकला 14 लिटरचा फ्युल टँक, 17-इंच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत. पुढे KYB USD फोर्क्स, तर मागे अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन आहे. बेस, स्पोर्ट, एम स्पोर्ट आणि एम स्पोर्ट विथ इनोव्हेशन पॅकेज असे 4 व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. भारतातील लाँचची अचूक तारीख आणि किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे या स्पोर्ट्सबाइकच्या भारतीय किमतीकडे बाइकप्रेमींचे लक्ष लागले आहे.
BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: बीएमडब्ल्यू एफ 450 आरआर भारतात कधी लाँच होणार?
उत्तर: या बाइकचे ग्लोबल पदार्पण झाले असून भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. पण कंपनीने भारतातील लाँचची अचूक तारीख जाहीर केलेली नाही.
प्रश्न 2: बीएमडब्ल्यू एफ 450 आरआरमध्ये किती पॉवर आणि टॉर्क मिळतो?
उत्तर: या बाइकच्या 420cc ट्विन-सिलिंडर इंजिनमधून 8,750 rpm वर 47 bhp पॉवर आणि 6,750 rpm वर 43 Nm टॉर्क मिळतो. याला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे.
प्रश्न 3: बीएमडब्ल्यू एफ 450 आरआरची भारतात कोणत्या बाइक्सशी स्पर्धा होईल?
उत्तर: भारतीय मार्केटमध्ये या बाइकची स्पर्धा एप्रिलिया आरएस 457, कावासाकी निन्जा 500 आणि केटीएम आरसी 390 यांच्याशी होण्याची शक्यता आहे.






