(फोटो सौजन्य-AI एआय)
469 hp पॉवर आणि 645 Nm टॉर्क
i3 50 xDrive मध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप असून कारला 469 hp पॉवर आणि 645 Nm टॉर्क मिळतो. 108.7 kWh बॅटरीसह ही कार केवळ 4.7 सेकंदात 0 ते 100 km/h वेग गाठते. कंपनीच्या माहितीनुसार, 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमध्ये 423 km पर्यंतची WLTP रेंज वाढू शकते.
BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
दुसरे i3 व्हर्जनही सादर
BMWने i3 40 xDrive हे दुसरे इलेक्ट्रिक व्हर्जनही सादर केले आहे. यात 82.8 kWh बॅटरी आणि 374 hp पॉवर मिळते. याची WLTP रेंज 710 km पर्यंत आहे. दोन्ही इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये प्रत्येक अॅक्सलवर एक इलेक्ट्रिक मोटर असून ऑल-व्हील ड्राइव्ह देण्यात आले आहे. पुढच्या वर्षी i3 M60 xDrive देखील येणार आहे.
पेट्रोल आणि हायब्रिड मॉडेल्सही कायम
नवीन 3 सीरीजमध्ये इलेक्ट्रिकसोबत पेट्रोल, 48V माइल्ड-हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनचे ऑप्शन असतील. पेट्रोल रेंजमध्ये M350 xDrive हे दमदार मॉडेल असून त्यात 3.0-लिटर इनलाइन 6-सिलिंडर इंजिन आणि 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टीम आहे. हे इंजिन 443 hp पॉवर देते आणि कार 4.1 सेकंदात 0 ते 100 km/h वेग पकडते.
किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट
इंटीरियरमध्येही मोठे बदल
नवीन BMW 3 सीरीजमध्ये Panoramic iDrive, 17.9-इंच सेंट्रल स्क्रीन आणि ऑप्शनल 3D हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे. Operating System X मध्ये टच, फिजिकल कंट्रोल्स आणि व्हॉइस कमांडचा वापर करता येतो. Amazon Alexa+ आणि Harman Kardon ऑडिओसारखे फीचर्सही मिळतात.
Neue Klasse प्लॅटफॉर्मची ताकद
इलेक्ट्रिक i3 ही Neue Klasse आर्किटेक्चरवर आधारित पहिली 3 सीरीज आहे. यात Gen6 eDrive, नवीन सिलिंड्रिकल बॅटरी सेल्स आणि बायडायरेक्शनल चार्जिंगसारख्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक i3 चे प्रोडक्शन म्युनिक प्लांटमध्ये, तर पेट्रोल 3 सीरीजचे प्रोडक्शन Dingolfing येथे होणार आहे.






