फोटो सौजन्य: Social Media
फक्त देशातच नव्हे तर जगभरात इलेक्ट्रिक वाहनाचा डंका वाजत आहे. भारतात तर आता प्रत्येक दुचाकी उत्पादक कंपनी इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. ग्राहक सुद्धा या इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. या प्रतिसादामागचे कारण म्हणजे पेट्रोलच्या किंमतीत सतत होणारी वाढ.
आता अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच जरी होत असले तरी आधी फक्त एकच कंपनी होती जी आपल्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटरमुळे ओळखली जाते, ती म्हणजे ओला इलेक्ट्रिक. ही कंपनी गेली अनेक वर्ष उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे. आता तर कंपनीने आपली इलेक्ट्रिक बाईक सुद्धा मार्केटमध्ये आणली आहे. जर तुम्ही सुद्धा ओला इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
ओला इलेक्ट्रिकने ऑक्टोबर महिन्यात दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटच्या ऑफर सुरू ठेवल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री वाढवण्यासाठी Ola S1 वर नोव्हेंबरमध्येही दमदार ऑफर दिली जात आहेत. Ola S1 वर डिस्काउंट ऑफरमुळे 15,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. तसेच, पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरच्या तुलनेत या EV वर दरवर्षी सुमारे 30,000 रुपयांची बचत करून देतात.
Ola इलेक्ट्रिक S1 चे सहा मॉडेल सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत, जे अनेक बॅटरी पॅक पर्यायांसह बाजारात उपलब्ध आहेत. यामधील S1X ही सर्वात स्वस्त स्कूटर आहे. या EV ची किंमत 74,999 रुपयांपासून सुरू होते. तर Ola S1 Air ची एक्स-शोरूम किंमत 1,00,499 रुपयांपासून सुरू होते. Ola S1 Pro ची किंमत 1,19,999 रुपयांपासून सुरू होते.
Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज त्याच्या बॅटरी पॅकच्या बदलीनुसार बदलते. ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर 195 किलोमीटरपर्यंत सर्वात जास्त रेंज ऑफर करण्याचा दावा करते.
Ola S1X तीन बॅटरी पॅकच्या पर्यायासह येते. यामध्ये बसवलेली 2 kWh बॅटरी 95 किलोमीटरची रेंज देते. त्याच वेळी, 3 kWh क्षमतेच्या बॅटरीसह, कंपनीने 151 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा केला आहे. तसेच, 4 kWh बॅटरी पॅकसह प्रमाणित रेंज 193 किलोमीटर आहे.
Ola S1 Air फक्त एका बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये 151 किलोमीटर अंतर कापू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ओलाची ही EV 3.3 सेकंदात 0 ते 40 kmph चा वेग गाठू शकते.
ओलाची सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro आहे. सिंगल चार्जिंगवर या स्कूटरची प्रमाणित रेंज 195 किलोमीटर आहे. ही EV 120 kmph च्या टॉप स्पीडवर जाऊ शकते. तर S1 Pro 2.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो.