फोटो सौजन्य: iStock
भारतात लक्झरी कार्सबद्दल नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे. आजही एखाद्या रोडवरून लक्झरी कार जाताना दिसली की आपसूकच आपली नजर तिच्यावर रोखली जाते. या लक्झरी कार्स सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असणायचे मोठे कारण म्हणजे अनेक दिग्गज मंडळी आणि सेलिब्रेटीजकडून या कार्सचा केले जाणारा वापर.
सर्वसामान्यांमध्ये सेलिब्रेटज लोकांचा प्रभाव जास्त असतो ज्यामुळे त्यांनी वापरलेल्या कार्स आपसूकच लोकांच्या चर्चेचा विषय बनतात. भारतात तसे अनेक ऑटो कंपनीज आहेत ज्या लक्झरी कार्स उत्पादित करतात. पण त्यातही कुठली कार जास्त लोकप्रिय असेल तर ती म्हणजे रेंज रोव्हर. बॉलिवूडचे अनेक सितारे या कारमध्ये फिरताना दिसतात.
हे देखील वाचा: ड्राईव्ह करताना जर ‘या’ 3 सवयी नाही बदलल्या तर कारचा क्लच प्लेट देईल धोका
लँड रोव्हर किंवा रेंज रोव्हर ही भारतातील सर्वात लोकप्रिय लक्झरी कार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या ब्रँडच्या कारमधून प्रवास करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते भारतीय क्रिकेटपटूंपर्यंत या कारची क्रेझ आहे. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी नुकतीच ही ब्रँडेड कार खरेदी केली आहे. कंगना राणौत, संजय दत्त, आलिया भट्ट, हार्दिक पांड्या यांच्यासह अनेक स्टार्सनी रेंज रोव्हर आपल्या घरी आणली आहे.
रेंज रोव्हर खरेदी करण्यासाठी एकाच वेळी संपूर्ण पैसे भरण्याची गरज नाही. बँकेकडून कर्ज घेऊनही तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार चार किंवा पाच वर्षांसाठी ईएमआय घेऊ शकता. लँड रोव्हरची ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करावे लागेल आणि दरमहा किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल याची संपूर्ण माहिती, आज आपण जाणून घेणार आहोत.
लँड रोव्हर रेंज रोव्हरच्या 3.0-लिटर LWB ऑटोबायोग्राफी मॉडेलची ऑन-रोड किंमत 2.98 कोटी रुपये आहे. देशातील विविध शहरांमध्ये या किंमतीत फरक असू शकतो, त्यानुसार तुम्हाला तुमचं बजेट सेट करावा लागेल.
रेंज रोव्हर ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 29.89 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बँकेकडून 2.69 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल, ज्यावर तुम्हाला 9 टक्के व्याजासह दरमहा ठराविक रक्कम बँकेत जमा करावी लागेल. जर तुम्ही हे कार लोन चार वर्षांसाठी घेतले तर 9 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा सुमारे तब्बल 6.70 लाख रुपये द्यावे लागतील.
तुम्ही चार वर्षांऐवजी पाच वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, तुम्हाला कार कर्जावर 9 टक्के व्याजासह दरमहा सुमारे 5.60 लाख रुपये बँकेत जमा करावे लागतील. 6 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, दरमहा ईएमआयची रक्कम सुमारे 4.85 लाख रुपये असेल आणि जर तुम्ही सात वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 4.33 लाख रुपये बँकेत जमा करावे लागतील.