
फोटो सौजन्य - Social Media
या ऑफरमुळे Kawasaki Versys-X300 खरेदी करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कंपनीची ही अॅडव्हेंचर-टूरर बाईक आधी ₹3.49 लाख (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध होती; मात्र आता ₹25,000 सूट मिळाल्याने ती ₹3.24 लाखांत मिळू शकते. वर्षअखेरीस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कावासाकीने ही मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर केली असून, लाँग राइड्स आणि टूरिंगचा आनंद घेणाऱ्या रायडर्ससाठी ही बाईक अधिक परवडणारी ठरणार आहे.
Kawasaki Versys-X300 मध्ये 296cc चे पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून ते 39 hp पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकला 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच देण्यात आला आहे, ज्यामुळे हायवे तसेच ऑफ-रोड राइडिंग करताना स्मूथ अनुभव मिळतो. मजबूत स्टील फ्रेम, लांब सस्पेन्शन ट्रॅव्हल आणि 19-17 इंच स्पोक व्हील्समुळे ही बाईक खराब रस्त्यांवरही स्थिरता देते.
याशिवाय, ड्युअल-चॅनल ABS, डिस्क ब्रेक्स आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी आवश्यक फीचर्स या बाईकमध्ये मिळतात. कावासाकीने या मॉडेलमध्ये नवीन Candy Lime Green / Metallic Flat Spark Black रंगसंगतीही सादर केली आहे. त्यामुळे स्टायलिश लूकसोबत दमदार परफॉर्मन्स हवी असणाऱ्या बाईकप्रेमींसाठी ही ऑफर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.