(फोटो सौजन्य-AI एआय)
इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी बीवायडीने खास एडिशन सादर केले आहे. बीवायडी सीलायन 7 फेस्टिव्ह एडिशन भारतात 50.60 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या स्पेशल एडिशनची फक्त 150 युनिट्स विकली जाणार आहेत. हे मॉडेल केवळ प्रीमियम व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल असून, त्यात मुख्य बदल इंटिरियरच्या रंगसंगतीत करण्यात आला आहे.
इंटिरियरमध्ये मिळणार नवा लूक
सीलायन 7 फेस्टिव्ह एडिशनमध्ये टॅन आणि ब्लॅक अशा ड्युअल-टोन रंगसंगतीचा केबिन मिळतो. यामुळे एसयूव्हीच्या इंटिरियरला वेगळा आणि प्रीमियम लूक मिळतो. याशिवाय, गाडीच्या बाहेरील डिझाइन किंवा इतर प्रमुख फीचर्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे एडिशन प्रामुख्याने नवीन केबिन लूक आणि लिमिटेड उपलब्धतेमुळे खास ठरते.
बॅटरी, रेंज आणि दमदार परफॉर्मन्स
या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 82.56 kWh क्षमतेची ब्लेड बॅटरी देण्यात आली आहे. मागील बाजूस बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 230 kW म्हणजेच 308 hp पॉवर आणि 380 Nm टॉर्क निर्माण करते. ही एसयूव्ही 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 6.7 सेकंदांत गाठू शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, एका चार्जवर 567 किमीपर्यंत रेंज मिळते. ही रेंज NEDC टेस्टिंग सायकलनुसार आहे; प्रत्यक्ष वापरात ड्रायव्हिंगची पद्धत, वेग आणि हवामानामुळे रेंज बदलू शकते.
बीवायडीने या मॉडेलमध्ये सेल-टू-बॉडी (CTB) टेक्नोलॉजी दिली आहे. यात बॅटरी पॅक गाडीच्या स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट केला जातो. यामुळे बॉडीची मजबुती आणि बॅटरीच्या जागेचा वापर सुधारण्यास मदत होते. ट्रॅक्शननुसार टॉर्क नियंत्रित करणारी टॉर्क अॅडॅप्टेशन कंट्रोल प्रणालीही यात आहे.
टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर
फीचर्स आणि सेफ्टीवरही भर
सीलायन 7 मध्ये 15.6-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, क्विल्टेड नप्पा लेदर सीट्स, इलेक्ट्रिक सनशेडसह पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि हेड-अप डिस्प्ले मिळतो. सुरक्षिततेसाठी 11 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. या एसयूव्हीला युरो एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
गाडीची लांबी 4,830 मिमी, रुंदी 1,925 मिमी आणि उंची 1,620 मिमी आहे. व्हीलबेस 2,930 मिमी असून, मागील बूटमध्ये 500 लिटर सामान ठेवता येते. मागच्या सीट्स फोल्ड केल्यावर ही जागा 1,789 लिटरपर्यंत वाढते. पुढील फ्रंकमध्ये 58 लिटरची अतिरिक्त स्टोरेज जागा आहे.
बीवायडी सीलायन 7 भारतात 2025 मध्ये दाखल झाली होती. कंपनीच्या माहितीनुसार, या मॉडेलची देशभरात 4,500 पेक्षा जास्त युनिट्स विकली गेली आहेत. मर्यादित 150 युनिट्स आणि नवीन इंटिरियरमुळे फेस्टिव्ह एडिशनला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






