फोटो सौजन्य-iStock
कोलकाता, बदलापूर अशा असंख्य महिला अत्याचाराच्या घटनांनी देश हादरला आहे. देशातील महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. देशात महिला सुरक्षिततेसाठी जागोजागी आंदोलने केली जात आहेत. कॅंडल मार्च काढले जात आहे, बंदची हाक दिली जात आहे.समाजातील ही विकृत मानसिकेतवर जरब बसणे आवश्यकच आहे. कारण आज प्रत्येक महिलेला आपण या समाजात सुरक्षित आहोत का? हा प्रश्न पडला आहे.
आजच्या काळात प्रत्येक जण शहरामध्ये दिवसा रात्री कॅबने प्रवास करतो. मात्र कॅब प्रवासामध्येही सुरक्षितता महत्वाची आहे. कॅब प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कॅब सेवा पुरविणाऱ्या कंपना त्यांच्या अॅपमध्ये वापरकर्त्यांसाठी सुरक्षा वैशिष्ट्ये अपडेट करतात. मात्र आजही आपल्याला त्या वैशिष्ट्यांची माहिती नसते. जाणून घेऊया ही वैशिष्टे
उबेर कॅब राईडमधील सुरक्षितता वैशिष्ट्ये
सुरक्षा वैशिष्ट्यांचा होणारा फायदा
या वैशिष्टांमुळे जर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असाल किंवा अचानक बराच वेळ थांबलात, अशावेळी Uber सुरक्षा चेक-इन वैशिष्ट्याद्वारे तुमच्या कॅब राइडचा मागोवा घेईल. तुम्हाला वाटत असेल की कॅबमध्ये कोणतीही समस्या आहे अथवा तुम्ही असुरक्षित आहात, तुमच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही ॲपवरून 100 नंबर डायल करू शकता, ज्यामुळे तुमच्या कारचे जीपीएस ट्रॅकिंग आपोआप पोलिसांपर्यंत पोहोचते. रेकॉर्डिंग वैशिष्ट्याद्वारे तुमचे कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल. तसेच, प्रत्येक राइडसोबत, वाहनाची माहिती आणि जीपीएस माहितीही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवली जाते.