फोटो सौजन्य: YouTube
नुकतेच टाटाने कूप एसयूव्ही लाँच केली होती. या कारची भारतीय कार मार्केटमध्ये चांगलीच हवा झाली होती. परंतु जर तुम्ही विचार करत असाल ही कूप एसयूव्ही भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे तर थोडे थांबा. कारण याही पेक्षा स्वस्त कूप एसयूव्ही भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
Citroen India ने भारतात आपली कूप SUV Basalt ची डिलिव्हरी सुरू केली आहे. भारतात लाँच होणारी ही सर्वात स्वस्त कूप एसयूव्ही आहे. आत्तापर्यंत मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार निर्मात्या कंपन्यांच्या महागड्या कूप एसयूव्ही भारतात उपलब्ध होत्या, परंतु सिट्रोएनने भारतीय ग्राहकांना एक उत्तम आणि परवडणारा उपलब्ध करून दिला आहे. Citroen Basalt भारतीय बाजारपेठेत 7.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: ‘या’ बाईकच्या किंमतीत दारात Fortuner कार उभी राहील, जाणून घ्या फीचर्स
Citroen Basalt ची थेट स्पर्धा Tata Curvv सोबत होणार आहे, जी 2 सप्टेंबर रोजी लाँच होईल. माहितीनुसार, Tata Curvv 10 लाख रुपयांना लाँच केली जाऊ शकते, ज्यामुळे ती Basalt कारपेक्षा महाग होणार आहे.
कंपनीने बेसॉल्टचा पुढचा भाग Citroen C3 Aircross सारखाच ठेवला आहे. यात समान स्टाइलचे डीआरएल, हेडलॅम्प क्लस्टर, ग्रिल आणि पुढच्या बाजूला एअर इनटेकचे प्लेसमेंट देखील आहे. बेसाल्टचे डिझाईन पाहताच ती कूप एसयूव्ही असल्याचे स्पष्ट होते. यात कूप रूफलाइन आहे, जी इनबिल्ट स्पॉयलर लिपसह बी-पिलरला खालच्या दिशेने जोडते. कारच्या उच्च व्हेरियंटमध्ये 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
डॅशबोर्ड डिझाइन आणि 10.25-इंच सेंट्रल टचस्क्रीन सारख्या एलिमेंटसह, या कारच्या आतील भागात तुम्हाला C3 एअरक्रॉसची झलक पाहायला मिळते. एअरक्रॉसच्या विपरीत, यात 7.0-इंचाचा संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आहे. यात मागील सीटसाठी ॲडजस्टेबल अंडर-थाई सपोर्ट आहे. बेसाल्टमध्ये 15-वॅटचा वायरलेस फोन चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी देखील दिली आहे.
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात दोन पेट्रोल इंजिन पर्याय दिले आहेत. पहिले नॅचरली एस्पिरेटेड 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 81 bhp आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.
बेसाल्टमध्ये दुसरे 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 108 bhp पॉवर आणि 195 Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.