फोटो सौजन्य- iStock
मोठ्या शहरांमध्ये फोर व्हीलर वाहनांची विक्री होते त्याचप्रमाणे देशातील लहान वाहनांंमध्ये ही विक्री होते. या विक्रीमध्ये आता अनोखा बदल पाहण्यास मिळत आहे तो म्हणजे एसयुव्हीची विक्री ग्रामीण भागात वाढण्याचा. हे आहेत.
भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी दक्षिण कोरियन कार निर्माती कंपनी Hyundai Motor India तिच्या SUV लाइनअपसाठी ग्रामीण आणि प्रथम एसयुव्ही खरेदीदारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब ठरत आहे. ग्रामीण कार खरेदीदारांचा आता ह्युंदाईच्या एकूण विक्रीमध्ये तब्बल 21% पेक्षा जास्त वाटा आहे. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक वाटा आहे. Hyundai कडून भारतातील लहान, निम्न शहरातील वाढत्या आकांक्षा कंपनीच्या SUV (स्पोर्ट्स युटिलिटी वाहन) विक्रीला चालना देत आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या विक्रीमध्ये Hyundai च्या SUV चा एकूण कारच्या विक्रीत तब्बल 67% वाटा होता, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
मध्यम ते मोठ्या आकाराच्या एसयूव्हीसाठी डिझेल इंधनाचा पर्याय महत्वाचा
ह्युंदाईने मध्यम ते मोठ्या आकाराच्या एसयूव्हीसाठी डिझेल इंधनाचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. जो ग्राहकांना साठी मह्त्वाचा पर्याय ठरत आहे. Hyundai च्या अल्काझार आणि टक्सन सारख्या डिझेल मॉडेलने विक्रीमध्ये जवळपास 60% वाढ केली आहे, जे या विभागातील इंधन कार्यक्षमतेला स्पष्ट प्राधान्य ठळकपणे दर्शवते. असे प्रमुख ह्युंदाई मोटर इंडियाचे ऑपरेटिंग अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक तरुण गर्ग म्हणाले.
SUV च्या सर्वोत्तम विक्रीची कारणे
गर्ग पुढे म्हणाले, भारतातील रस्त्यांचे जाळे विस्तारत असताना ग्रामीण खरेदीदारांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे वाहन निर्मात्यांना पूर्वी कमी असलेल्या प्रदेशांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यासाठी नवीन संधी निर्माण होत आहे. “ग्रामीण भारतामध्ये रोड कनेक्टिव्हिटी सुधारली आहे आणि आम्ही लहान शहरे आणि खेड्यांमधून एसयूव्हीची निवड करणाऱ्या खरेदीदारांची वाढती संख्या पाहत आहोत,” ही वाढती मागणी देखील प्रथमच खरेदीदारांच्या वाढत्या आकांक्षांद्वारे मिळत आहे. विशेषत: मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये, ज्यामध्ये Hyundai ची क्रेटा अव्वल कामगिरी करत आहे.
Hyundai कडून Alcazar चे नवे एडीशन लॉंच
Hyundai ने सोमवारी ( दि. 9 सप्टेंबर) 7-सीटर SUV Alcazar चे रिफ्रेश केलेले एडिशन लॉन्च केले, या SUV ची पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आणि बेस डिझेल व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत ही 15.99 लाख रुपये आहे.