फोटो सौजन्य- iStock
भारतीय कार बाजारपेठेत अनेक मोठ मोठ्या कंपन्यांना काही काळासाठी चांगली कामगिरी करता येत नाही मात्र एखादी कार बाजारात येते आणि कंपनीची कामगिरी सुधारते अशी अनेक उदाहरणे आहेत. फ्रांन्सची कार निर्माती कंपनी सिट्रोएन (Citroen)च्या बाबतीत हेच घडण्यास सुरु झाले आहे. गेली काही महिने सिट्रोएनची विक्री कामगिरी अतिशय निराशाजनक होती. वारंवार विक्रीत घट होत होती. त्यामुळे कंपनीच्या भारतातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र या स्थितीत सिट्रोएनसाठी संकटमोचक ठरली आहे, Citroen Basalt ही कार. ऑगस्ट महिन्यात या कारने चांगलीच झेप घेत कंपनीसाठी विक्रीवाढ नोंदविली आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीची सर्व वाहनांची विक्री जुलै महिन्याच्या तुलनेत जवळ जवळ चौपटीने वाढली आहे.
ऑगस्टमधील एकूण कारविक्रीत Citroen Basalt चा 45 टक्के वाटा
सध्या Citroen च्या बाजारामध्ये 5 कार्स आहेत. C5 एयक्रॉस, C3, EC3,C3 एयक्रॉस आणि Citroen Basalt ही नवी कार. मागील पाच महिन्याचा एकू विक्री अहवाल पाहिल्यास एप्रिलमध्ये 404, मे मध्ये 515, जून मध्ये 339, जुलैमध्ये 335 कारची विक्री झाली. मात्र कंपनीने ऑगस्टमध्ये Citroen Basalt बाजारात आणल्यानंतर त्या महिन्याची एकून वाहन विक्री ही 1275 झाली त्यातील 45 टक्के म्हणजे 579 वाहने ही Citroen Basalt ची आहेत. त्यामुळे Basalt च्या येण्याने कंपनीला नव संजीवनी मिळाली आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Citroen Basalt चे इंजिन
कारमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय दिले आहेत. पहिले नैसर्गिकरीत्या एस्पिरेटेड 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 81 bhp आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससहित उपलब्ध आहे. दुसरे, 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 108 bhp पॉवर आणि 195 Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.
5-दरवाजा असलेल्या Citroen Basalt मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक्स, MacPherson स्ट्रट सस्पेंशन आणि मागील ड्रम ब्रेक्स आहेत. त्याची लांबी 4352 mm आहे आणि 2651 mm चा व्हीलबेस आहे, कारमध्ये 470 लीटर बूट स्पेस देखील असल्यामुळे कुटुंबासह प्रवास करताना पुरेसे सामान ठेवता येते.
सुरक्षा वैशिष्ट्ये
Citroen Basalt मध्ये 6 airbags, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि ABS सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये एकमेकांना पूरक आहेत. डिझाईनमध्ये ओव्हरस्पीड चेतावणी, टायर प्रेशर मॉनिटरिंग, हिल असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल ही सुरक्षात्मक वैशिष्ट्ये आहेत.
सिट्रोएन बेसाल्टची सध्या बाजारातील एक्स शो रुम किंमत ही 7.99 लाख रुपये ते 13.89 रुपये आहे. या कारची थेट स्पर्धा ही मारुती ग्रँड विटारा, टाटा कर्व्ह होंडा एलिव्हेट,ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस या कारशी आहे.