Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिना 25 हजार कमावणाऱ्या ‘या’ ट्रक चालकाने अडीच वर्षात बांधले 1 कोटींचे घर, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

सध्या आपण एका डिजिटल जगात वावरत आहोत जिथे अनेकांचे आयुष्य आपण Daily Vlog मार्फत आपण बघत असतो. YouTube या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्ममुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. जे काल हजारात कमावत होते तेच लोकं आज युट्युबवर आपले व्हिडिओज अपलोड करून लाखो कमावत आहे. आज आपण एका अशाच एका युटूबरची गोष्ट जाणून घेणार आहोत. जो आज ट्रक ड्रायवर जरी असला तरी त्याचे युट्युबवर लाखो सबस्क्रायबर्स आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 23, 2024 | 05:46 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या बाजूला असे अनेक लोकं आहेत ज्यांची कमाई जेम थेम काही हजारांच्या घरात असते. या कमी पैश्यामुळे त्यांना आपली व आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यास अडथळा येत असतो. आपलं स्वतःच घर बांधणं हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं. हेच स्वप्न झारखंडच्या राजेश रवानी यांनी फक्त अडीच वर्षात पूर्ण केले आहे. चला जाणून घेऊया हे कसे शक्य झाले आहे.

कोण आहे राजेश रवानी?

राजेश रवानी हे एक ट्रक ड्रायवर आहे. त्याच्या दिवसातला निम्मा वेळ ते ट्रक चालवण्यात घालवतात. राजेश यांना पाककलेची खूप आवड आहे. ते नेहमीच निरनिराळे पदार्थ आपल्या हाताने बनवत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपले युट्युब चॅनेल सुरु केले. या चॅनेलवर ते आपल्या ट्रकमध्ये निरनिराळे पदार्थ बनवायचे. लवकरच त्याच्या चॅनेलचे सबस्क्रायबर्स वाढू लागले व त्यांची युटूबवरून कमाई सुद्धा चालू झाली. आज याच त्यांच्याब युट्युब चॅनेलमुळे त्यांनी 1 कोटी रुपयांचे घर अडीच वर्षांत बांधले आहे.

हे देखील वाचा: या 5 एक्सेसरीजच्या साहाय्याने बनवा तुमच्या कारला एकदम टॉपची मॉडेल

सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत राजेश रवाणी यांनी ट्रक ड्रायव्हर असताना 1 कोटी रुपयांचे घर कसे बांधले याचा खुलासा केला. राजेश रवाणी यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून ट्रक चालवत आहेत आणि ट्रक चालवताना त्यांची मासिक कमाई 25,000 ते 30,000 रुपये असते.

ट्रक ड्रायव्हर बनला युटूबर

ट्रक ड्रायव्हर असण्यासोबतच राजेश रवाणी सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. राजेश रवाणी यांचे स्वतःचे YouTube चॅनेल देखील आहे, ज्यामध्ये ते त्यांचे ट्रक चालवण्याशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. राजेश रवाणी यांचे सध्या YouTube वर 1.89 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या चॅनलवरून 914 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

इथून झाला युट्युबचा प्रवास सुरु

राजेश रवाणी यांनी सांगितले की, हे यूट्यूब चॅनल त्याच्या मुलांनी तयार करून दिले होते. राजेश रवाणी यांनी सांगितले की, एकदा ते कामानिमित्त बाहेर असताना त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता आणि तो आपल्या मुलाला पाठवला होता. राजेश याना न सांगता त्याच्या मुलाने तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून टाकला. व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या मुलांनी व्हिडिओ अपलोड करणे सुरूच ठेवले. आज याच युट्युब चॅनेलमुळे राजेश दर महिन्याला यूट्यूबवरून चार ते पाच लाख रुपये कमावत आहे.

Web Title: Famous youtuber and truck driver rajesh rawani built 1 crore rupees house in two and half years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 04:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.