फोटो सौजन्य: iStock
आपल्या स्वतःच्या बाईकवर कुठेतरी लांब फिरायला जावं हे प्रत्येक तरुणाचे व मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न अनुभवण्यासाठी अनेक जण आपली आवडती बाईक विकत घेत असतात. बाईक जेव्हा नवीन असते तेव्हा तिला चालवायला मजा येत असते. पण हळूहळू जसा वेळ जात असतो तसा बाईकचा मायलेज कमी होऊ लागतो.
जर बाईकचा मायलेज कमी असेल तर अनेकांना ती लॉंग राइडवर घेऊन जायला आवडत नाही. कारण साहजिकच कमी मायलेज देणारी बाईक तुम्हाला जास्त खर्चात पाडते. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला बाईकचा मायलेज वाढवण्याचे उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागणार नाही.
तुमची बाईक नियमित स्वच्छ करत चला. यामुळे बाईकच्या मोमेंटममध्ये कोणताही अडथळा येत नाही ज्यामुळे अनावश्यक इंधन खर्चातही बचत होते. तुमच्या बाईकवर चिखल असल्यास ते सुकण्यापूर्वी काढून टाका. असे न केल्यास बाईक सहजपणे गंज पकडेल आणि घाण प्रत्येक घटकातील लुब्रिकेंट खेचून फ्रिक्शन वाढवेल. यामुळे इंजिनला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे.
ज्या लोगोने Audi ला ओळख दिली त्याच लोगोत केला बदल, जाणून घ्या या निर्णयामागचे कारण
तुमच्या बाईकमधील चेन, इंजिन आणि इतर ठिकाणी ऑइल लावण्याची विशेष काळजी घ्या. बाईकचे सर्व भाग व्यवस्थित लुब्रिकेटेड असल्यामुळे इंजिन, चेन इत्यादींना फारसे फ्रिक्शन करावे लागत नाही. यामुळे तुमच्या बाईकचे मायलेज सुधारते. जर तुमची दुचाकी डिस्क ब्रेकसह येत असेल, तर इंजिन ऑइल, कूलिंग फ्लुइड आणि ब्रेक ऑइल यासारख्या लिक्विड पदार्थांची पुरेश्या प्रमाणात लेव्हल ठेवा. यासोबतच ऑइल किंवा लिक्विड नियमितपणे बदला.
जर तुम्ही बाईकवर जास्त भार टाकला तर त्याचा मायलेजवर परिणाम होतो. यामुळे इंजिनला अधिक काम करावे लागणार असून त्याची क्षमता वाढवावी लागणार आहे. यामुळे बाईकला वेग वाढवण्यासाठी जास्त इंधन खर्च करावे लागणार आहे. त्याच वेळी, जर तुम्ही बाईकवर नियमित अतिरिक्त भार दिला तर त्याच्या इकॉनॉमी फिगरवरही परिणाम होतो. हे लक्षात घेऊन बाईकवर जास्त भार न टाकण्याचा प्रयत्न करा आणि बाईकचा मायलेज वाढवा.
अनेकांना क्लच आणि ब्रेकवर एक किंवा दोन बोटे ठेवून बाईक चालवण्याची सवय असते. एवढेच नाही तर अनेकजण नकळत उजव्या पायाने मागील ब्रेक पेडल दाबून बाईक चालवतात. क्लच आणि ब्रेक ऑपरेट केल्याने मायलेजवर विनाकारण परिणाम होऊ शकतो.
वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींचे तुम्ही पालन करू शकता, परंतु जर तुम्ही रेसरप्रमाणे बाईक चालवत असाल तर त्याचा तुमच्या बाईकच्या मायलेजवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बाईकचे इंजिन त्याच्या optimum zone मध्ये फिरत असताना, ऍक्सीलेटर कमी-जास्त करा. तुम्ही खूप वेळा अपशिफ्ट केल्यास बाईकच्या मायलेजवर विपरित परिणाम होईल. एवढेच नाही तर बाईकचे इंजिनही खराब होऊ शकते.