Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक ऑटो कंपन्या दमदार डिस्काउंट देत असतात. आता एमजी मोटर्स, मारुती सुझुकी, होंडा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या त्यांच्या कारवर 6 लाख रुपयांपर्यंतची मोठी सूट देत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 28, 2025 | 09:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या फेस्टिव्ह सिझनमध्ये अनेक जण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन नवीन कार्याला सुरुवात करत असतात. काही जण या उत्सवात नवीन घर खरेदी करतात तर काही स्वतःचा बिझनेस सुरु करतात. याच शुभ मुहूर्तावर जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही ऑटो कंपन्या बेस्ट डिस्कॉऊंट ऑफर करत असतात.

भारतात गणेश चतुर्थी 2025 पासून सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. परंपरेनुसार, या दिवसात कार खरेदी करणे शुभ मानले जाते. म्हणूनच, मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडा आणि एमजी मोटर्स सारख्या मोठ्या कार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या डिस्काउंट देत आहेत. यावेळी ऑफर इतक्या मोठ्या आहेत की काही मॉडेल्सवर 6 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संजय दत्तने खरेदी केली 4 कोटीची Mercedes Maybach GLS600, काय आहेत खास फिचर्स

एमजी मोटर्सचा डिस्काउंट ऑफर

एमजी मोटर्सने आपल्या लोकप्रिय मॉडेल्स, Comet EV, ZS EV, अ‍ॅस्टर, हेक्टर आणि ग्लॉस्टरवर खास डिस्कॉऊंट जाहीर केल्या आहेत. कॉमेट EV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुमारे 56,000 रुपयांची सूट मिळत आहे, तर ZS EV आणि अ‍ॅस्टरवर 1.10 लाख रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. हेक्टर खरेदीदारांसाठी कंपनीकडून तब्बल 1.15 लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कॅश बोनस दिला जात आहे. याशिवाय, एमजी मोटर्सने आपल्या लक्झरी SUV ग्लॉस्टरवर सर्वात मोठा ऑफर दिला असून, ग्राहकांना तब्बल 6 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

द ग्रेट होंडा फेस्ट

होंडा कार्स इंडिया लिमिटेड ऑगस्ट 2025 मध्ये “द ग्रेट होंडा फेस्ट” साजरा करत आहे. या काळात, होंडा अमेझ, होंडा सिटी आणि एलिव्हेट सारख्या मॉडेल्सवर उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. होंडा सिटीवर 1.07 लाख रुपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे. त्याच वेळी, हायब्रिड व्हर्जन सिटी e:HEV वर 96,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. होंडा एलिव्हेटच्या टॉप-एंड ZX मॉडेलला सर्वाधिक फायदा आहे, ज्यामध्ये 1.22 लाख रुपयांपर्यंतची ऑफर समाविष्ट आहे. याशिवाय, ग्राहकांना दुसऱ्या जनरेशनच्या अमेझवर 77,200 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळत आहे.

EV मध्ये काय आहेत वैशिष्ट्ये, देशाच्या प्रगतीचे ठरणार पहिले चाक, PM Modi यांनी बांधले कौतुकाचे पूल!

मारुती सुझुकी सुद्धा देतेय दमदार डिस्काउंट

या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मारुती सुजुकीने आपल्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सवर मोठ्या डिस्काउंट ऑफर केल्या आहेत. जिम्नीच्या अल्फा व्हेरिएंटवर तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. स्विफ्ट AMT व्हेरिएंटवर 1.1 लाख रुपयांपर्यंत, तर वॅगनआर LXi वर 1.15 लाख रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. याशिवाय, एमपीव्ही इनव्हिक्टोवर 1.25 लाख रुपये आणि SUV ग्रँड विटारावर तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

ह्युंदाई कार्सचा ऑफर

ह्युंदाई देखील या फेस्टिव सीझनमध्ये मागे नाही. कंपनीकडून ग्रँड i10 निओस आणि एक्सेंटवर 30000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस तसेच 25,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे. याशिवाय ह्युंदाई टक्सन, अल्काझार, क्रेटा आणि वर्नावरही आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ह्युंदाई आयोनिक 2024 मॉडेलवर थेट 4 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे.

Web Title: Ganesh chaturthi 2025 tata hyundai offering car discount up to 6 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • Bumper discounts
  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त
1

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती
2

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती

Mumbai Famous Ganpati Mandal:मुंबईतले प्रसिद्ध गणेश मंडळ आणि डोळे दिपवणारा देखावा; पाहायला कसं जावं? जाणून घ्या सविस्तर
3

Mumbai Famous Ganpati Mandal:मुंबईतले प्रसिद्ध गणेश मंडळ आणि डोळे दिपवणारा देखावा; पाहायला कसं जावं? जाणून घ्या सविस्तर

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी,सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स
4

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी,सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.