फोटो सौजन्य- सोशल मीडिया
वर्ष अखेर असल्याने अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या वाहनांवर विशेष ऑफर्स देत आहेत. याच धर्तीवर कावसाकीने निन्जा या त्यांच्या स्पोर्ट्सबाईक श्रेणीतील बाईकवर ही धमाकेदार सवलत दिली आहे. त्यामुळे या काळात ग्राहकांना वाहन घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे जाणून घेऊया या बंपर सवलतीच्या ऑफर्सबद्दल
कावासाकी कंपनी निन्जा ६५० ( Kawasaki Ninja 650) वर ४५,००० रुपयांची सवलत देत आहे. कावासाकी निन्जा ६५० ची सवलत ही भारतातील वापरकर्त्यांना वर्षअखेरीस देण्यात येणाऱ्या सवलतीचा एक भाग आहे. निन्जा ६५० व्यतिरिक्त, कावासाकी कंपनीच्या भारतात विक्रीसाठी असलेल्या इतर मॉडेल्सवरही सवलत दिली जात आहे.
निन्जा ६५० आणि इतर मॉडेल्सवर दिली गेलेली सवलत
निन्जा ६५० वर ४५००० रुपयांची सूट मिळते आणि या बाईकची एक्स शोरुम किंमत ही ७.१६ लाख रुपये आहे. सवलतीनंतर या बाईकची प्रभावी किंमत ६.७१ लाख रुपये आहे. निन्जा श्रेणीतील सर्वात बेसिक बाईक मॉडेल असलेल्या निन्जा ३०० ला ३०,००० रुपयांची सवलत मिळत आहे. या मॉडेलची किंमत ३.४३ लाख रुपये आहे आणि सवलतीनंतर बाईकची किंमत ही ३.१३ लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहे. निन्जा ३०० ही बाईक सध्या केवळ भारतात ती विकली जात आहे. तर निन्जा ४०० ची जागा घेणाऱ्या निन्जा ५०० बाईक वर १५,००० रुपयांची सूट मिळते. निन्जा ५०० ही सीबीयू ( Completely Built Unit) आहे आणि या बाईकची किंमत ५.२४ लाख रुपये आहे. सवलतीनंतर निन्जा ५०० ची किंमत ५.०९ लाख रुपये इतकी असणार आहे.
निन्जा ब्रॅंड हा कावासाकीच्या स्पोर्टस बाइक्सचा प्रचंड लोकप्रिय ब्रँड आहे. पहिला कावासाकी निन्जा १९८४ ची GPZ900R होती आणि हे ब्रँड नाव बाईक आणि स्पेअर पार्ट्सवर वापरण्यासाठी ट्रेडमार्क केलेले आहे.
निन्जा व्यतिरिक्त मॉडेल्सवर उपलब्ध असेलेली सवलत
निन्जा मॉडेल्स व्यतिरिक्त,३०,००० रुपयांच्या सवलतीसह कावासाकी व्हर्सिस ६५० (Kawasaki Versys 650) मिळते. या बाईकची किंमत ७.७७ लाख रुपये आहे. तर सवलतीनंतरची किंमत ही ७.४७ लाख रुपये असेल. जुन्या मॉडेलच्या तुलनेत बाईकला ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, टीएफटी डिस्प्ले आणि मॉडेलच्या स्वरूपात अपडेट मिळते. तर, कावासाकी झेड ९०० वर ४०,००० रुपयांची सवलत उपलब्ध आहे. बाईकची सवलतीनंतरची किंमत ही ८.९८ लाख रुपये असेल. सर्व बाईकच्या किंमती या एक्स शो रुम किंमती आहेत.
वर नमूद केलेल्या जबरदस्त सवलतीमुळे ज्या ग्राहकांना कावासाकी निन्जा किंवा इतर बाईक विकत घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी एक सुवर्णसंधी आहे. नवीन कावासाकी बाईक घेण्याकरिता ग्राहकांनी जवळच्या कावासाकी डीलरशिपला भेट द्यावी.