फोटो सौजन्य: Freepik
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात फक्त इलेक्ट्रिक कार्स लाँच होत नसून अनेक इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कुटर्स सुद्धा लाँच होताना दिसत आहे. अनेक दुचाकीस्वार वाढत्या पेट्रोलच्या किंमतींना कंटाळले असून त्यापैकी अनेक जण इलेक्ट्रिक बाईक्स किंवा स्कुटर्सचा विचार करत आहे. हीच ग्राहकांची गरज लक्षात घेता अनेक टू व्हीलर कंपनीज मार्केटमध्ये आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कुटर्स लाँच करताना दिसत आहे.
नुकतेच ओला कंपनीकडून सुद्धा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये आणण्यात आली. याव्यतिरिक्त अशा अनके कंपनीज आहे जे आगामी काळात अधिक इलेक्ट्रिक टू व्हीलरर्स लाँच करणार आहे. अनेक दुचाकीस्वार सुद्धा इलेक्ट्रिक टू व्हीलरर्सला पसंती देताना दिसत आहे.
हे देखील वाचा: July 2024 झाली 7500 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री,जाणून घ्या कोणत्या कार्सनी मारली बाजी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात देशभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री झाली आहे. आज आपण जुलै 2024 मध्ये कोणत्या कंपनीने किती इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक विकल्या आहेत? टॉप-5 मध्ये कोणाचा समावेश झाला आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.
अहवालानुसार, जुलै 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक दुचाकींची एकूण विक्री 107716 इतकी झाली आहे. वर्षानुवर्षे ही वाढ सुमारे ९७ टक्क्याने होत आहे. तर जुलै 2023 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री 54616 इतकी झाली होती.
अहवालानुसार, इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने जुलै 2024 मध्ये दुचाकींच्या विक्रीच्या यादीत पहिल्या स्थानावर राहायचा मान मिळवला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 41624 दुचाकींची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच जुलै महिन्यात कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या 19406 युनिट्सची विक्री केली होती.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर विभागात टीव्हीएस मोटर्स दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीने जुलै 2024 मध्ये एकूण 19486 दुचाकींची विक्री केली आहे. तर जुलै 2023 मध्ये हा आकडा 10398 इतका होता. वार्षिक आधारावर बघता, कंपनीने आपली विक्री 87 टक्क्यांहून अधिक वाढवली आहे.
बजाज ऑटोने गेल्या महिन्यात एकूण 17657 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने जुलै 2023 मध्ये 4131 युनिट्सची विक्री केली होती.
इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीच्या बाबतीत एथर कंपनी पुढे आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 10087 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 6685 दुचाकींची विक्री केली होती.