रतन टाटांना Tata Nano बनवण्याची आयडिया नेमकी सुचली तरी कशी? जाणून घ्या
रतन टाटा हे एक असे आदर्श नाव आहे, जे कोट्यवधी लोकांचे प्रेरणास्थान बनले आहे. त्यांच्या निधनाने नक्कीच संपूर्ण देश हळहळ व्यक्त करीत आहे. परंतु ते जे आयुष्य जगले ते नक्कीच पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देणार आहे. या भारताच्या ‘रतन’ ने आपल्या आयुष्यात असे कित्येक महत्वपूर्ण कार्य केले ज्यामुळे ते लोकांच्या कायम स्मरणात राहिले. यातील सर्वात महत्वाचे कार्य होते जगातील सर्वात स्वस्त कार लाँच करणे. आपण सर्वेच जाणतो, रतन टाटा यांनी टाटा नॅनो ही बजेट कार लूणच केली होती. पण ही कार बनवण्याची आयडिया त्यांना सुचली तरी कशी? चला याबद्दल जाणून घेऊया.
रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते त्यांच्या लक्झरी कारमधून शहरातील रस्त्यांवर नेहमी फिरायचे. एकदा मुंबईच्या मुसळधार पावसात त्यांनी एका कुटुंबातील चार सदस्यांना स्कूटरवरून प्रवास करताना पाहिले. पावसामुळे ते कुटुंब खूप त्रास सहन करत प्रवास करत होते. त्यांच्या या अवस्थेकडे बघून रतन टाटा याना खूप वाईट वाटले. पण घटनेमधूनच टाटा यांनी नॅनो नांवाचे नवीन बीज पुढे पेरले.
हे देखील वाचा: ‘या’ एका अपमानामुळे बदलले रतन टाटा आणि टाटा मोटर्सचे नशीब, जाणून घ्या कंपनीची यशोगाथा
स्कूटरवरून त्या पावसात भिजणाऱ्या कुटुंबाकडे पाहून रतन टाटा यांना वाटले की, जर या कुटुंबाकडे एक छोटी कार असती तर ते नक्कीच आरामात प्रवास करू शकले असते. या घटनेनंतर त्यांनी टाटा नॅनो म्हणून ओळखली जाणारी जगातील सर्वात स्वस्त कार मार्केटमध्ये आणण्यास सुरुवात केली.
रतन टाटा यांनी 2008 मध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी एक छोटी आणि परवडणारी कार आणण्याचे स्वप्न पूर्ण केले. 10 जानेवारी 2008 रोजी प्रगती मैदान, दिल्ली येथे झालेल्या दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये त्यांनी टाटा नॅनो लोकांसमोर पहिल्यांदा सादर केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 1 लाख रुपये होती. यादरम्यान रतन टाटा म्हणाले होते की त्यांना भारतीय कुटुंबांना कमी खर्चात वाहतुकीचे उत्तम साधन उपलब्ध करून द्यायचे आहे.
2009 मध्ये भारताच्या रस्त्यावर जास्तीजास्त टाटा नॅनोच दिसत होती. पण 2019 पर्यंत या कारच्या विक्री संख्येत लक्षणीयरीत्या घाट झाली. 2019 च्या पहिल्या नऊ महिन्यांत टाटा नॅनोची एकही गाडी विकली गेली नव्हती. पुढे वर्षभरात या कारचे फक्त एक युनिट विकले गेले. यामुळे या कारचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले.