'या' एका अपमानामुळे बदलले रतन टाटा आणि टाटा मोटर्सचे नशीब, जाणून घ्या कंपनीची यशोगाथा
रतन टाटा, हे भारतातील उद्योजकांमधील मानाचं नाव आहे. त्यांच्या कित्येक निर्याणामुळे आज टाटा समूह एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचले आहे. परंतु काही वर्षांपूर्वी, एक अशी अपमानात्मक घटना रतन टाटा यांच्या आयुष्यात घडली होती, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले होते.
असे म्हणतात की अनेकदा सामान्य लोक अपमानाचा बदला लगेच घेतात, परंतु महान लोक आपला वेळ घेऊन यशाची पायरी घेतात. टाटा कंपनीला नव्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांच्यावर हे वाक्य अगदी चपखल बसते. टाटा सन्सच्या अंतर्गत 100 हून अधिक कंपनीज येतात. या कंपनीजमध्ये सुयांपासून स्टील, चहापासून ते पंचतारांकित हॉटेल्स आणि नॅनोपासून विमानापर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. आज आपण रतन टाटा यांच्या जीवनातील एक गोष्ट सांगणार आहोत, जी प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र आहेत. IBM ची नोकरी नाकारल्यानंतर रतन टाटा यांनी 1961 साली टाटा समूहात कर्मचारी म्हणून करिअरची सुरुवात केली. पण 1991 सालापर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. 2012 मध्ये ते निवृत्त झाले. रतन टाटा यांनी आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत कंपनीला यशाच्या शिखरावर नेले.
हे वर्ष 1998 चे होते, जेव्हा टाटा मोटर्सने आपली पहिली पॅसेंजर कार इंडिका बाजारात आणली होती. वास्तविक, हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पण या कारला हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टाटा मोटर्सला तोटा होऊ लागला आणि कंपनीशी संबंधित लोकांनी रतन टाटा यांना ते विकण्याचा सल्ला दिला. रतन टाटा यांची इच्छा नसतानाही त्यांना हा निर्णय स्वीकारावा लागला. यानंतर ते आपली कंपनी विकण्यासाठी अमेरिकन कंपनी फोर्डकडे गेला.
रतन टाटा आणि फोर्ड कंपनीचे मालक बिल फोर्ड यांच्यातील बैठक अनेक तास चालली. या वेळी बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांच्याशी चांगली वर्तवणूक नाही केली. तसेच त्यांना ज्या व्यवसायाची तुम्हाला माहिती नाही, त्या व्यवसायात तुम्ही इतके पैसे का गुंतवले? ही कंपनी विकत घेऊन आम्ही तुमचे उपकार करत आहोत असे बोलून फटकारले. हे शब्द बिल फोर्डचे होते पण ते रतन टाटा यांच्या हृदयावर आणि मनावर छापले गेले.
अपमानास्पद वाटून टाटा तिथून निघून गेले आणि तो करार रद्द केला. बिल फोर्डचे ते अपमानास्पद वाक्य त्यांना सतत अस्वस्थ करत होते. यानंतर रतन टाटा यांनी ही कंपनी कोणाला विकायची नाही असा निर्णय घेतला आणि कंपनीला अधिक उंचीवर नेण्यासाठी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एक संशोधन पथक तयार करून बाजारपेठेची नीट तपासणी केली. यानंतर टाटा इंडिकाने भारतीय बाजारपेठेत तसेच परदेशातही यशाच्या नवीन शिखरांना गाठल्याची कथा सर्वांनाच ठाऊक आहे.
पुढे 2008 साली फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. या संधीची वाट बघत रतन टाटा यांनी फोर्डची आलिशान कार लँड रोव्हर आणि जग्वार बनवणारी कंपनी जेएलआर खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला, जो फोर्डने त्वरित स्वीकारला.
ज्यावेळी बिल फोर्ड टाटा इंडिका कंपनी विकत घेणार होता तेव्हा जे वाक्य बोला होता, तेच वाक्य तो रतन टाटा यांना आपली कंपनी विकताना म्हणाला, फक्त यावेळी त्याने थोडा बदल केला. तो म्हणाला,”आमची कंपनी खरेदी करून तुम्ही आमच्यावर खूप उपकार करत आहात.”