फोटो सौजन्य - Social Media
जर आपण नियमितपणे बाईक्सचा वापर करत आहात. तर तुम्ही हा लेख नक्कीच वाचलं पाहिजे. आताचं काळात प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ केली जात आहे. अगदी खाण्या पिण्याच्या पदार्थांपासून ते अगदी गाड्यांच्या वाअपरात येणाऱ्या वस्तूंपर्यंत, अनेक गोष्टींमध्ये भेसळ आढळून येते. काही कंपन्या मुद्दाम अशा गोष्टी करत आहेत. महतवाची गोष्ट म्हणजे गाडी ज्याच्या जीवावर चालते त्या पेट्रोलमध्येही भेसळ आढळून येत आहे. पेट्रोल तसेच इतर इंधनांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण फार वाढले आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात झाली मोठी गुंतवणूक ! Skoda-Auto Volkswagen ने केली 15000 कोटी रुपयांची गुंतवणूक
अनेक ठिकाणी भेसळ करून इंधन पुरवणाऱ्या पेट्रोल पॅम्पच्या मालकांना चांगलेच भारी पडले आहे. या दरम्यान, या वाढत्या भेसळ इंधनाच्या प्रकरणामुळे वाहन चालक तणावामध्ये आले आहे. पेट्रोलचा दर आभाळाला स्पर्श करत आहे. यामध्ये पैसे घालवूनही लोकांना शुद्ध इंधन मिळताना मारामार होत आहे. मुळात, भेसळ केले गेलेल्या इंधनाचा वाईट परिणाम आपल्या वाहनावर जाणवतो. याने वाहनाचा इंजिन खराब होण्याची अफाट शक्यता असते.
बाईक चालवताना जर गाडी मध्ये धक्के देत असेल. यात्रेदरम्यान गाडी झटके खात असेल किंवा गाडी थांबत थांबत चालली असेल तर त्रुटी तुमच्या गाडीमध्ये नाही तर तुमच्या गाडीला चालवणाऱ्या पेट्रोलमध्ये आहे. कदाचित तुमच्या गाडीच्या पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ केली गेली आहे आणि याचाच परिणाम तुमच्या गाडीला जाणवत आहे. पेट्रोलमध्ये भेसळ आहे कि पेट्रोल शुद्ध आहे, ओळखण्याच्या काही पद्धती असतात. या पद्धती जाणून घेऊन भेसळ असणाऱ्या पेट्रोलपासून आपल्या गाड्यांचे आयुष्य वाचवा.
हे देखील वाचा : लॉंचिंगपूर्वी Kia कडून carnival चा टिझर प्रदर्शित, सनरुफ ठरतंय प्रमुख वैशिष्ट्य
पेट्रोल चेक करण्यासाठी, एक पारदर्शक भांडे घ्या. त्यामध्ये थोडे पेट्रोल काढून घ्या. जर पेट्रोल फिकट निळा किंवा गुलाबी रंगाचा असेल तर पेट्रोल शुद्ध आहे. जर पेट्रोलचा रंग पिवळसर किंवा काही बाजूत साडेद दिसून येत आहे तर पेट्रोलमध्ये भेसळ केली गेली आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल चेक करण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे एक टिश्यू पेपर घ्या. टिश्यू पेपरचा गुणधर्म असा असतो कि त्यावर डाग राहत नाहीत. जर एखादा टिश्यू पेपर पेट्रोलमध्ये बुडवला. काही वेळाने त्यावर पाहिले कि कोणतेही डाग दिसून येत नाही आहेत. तर पेट्रोल शुद्ध आहे. जर कोणत्याही प्रकारच्या तेलाचा डाग दिसून आला तर तुम्ही वापरत असलेला पेट्रोलमध्ये भेसळ आहे.