फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच होत आहेत. या कार्सना ग्राहकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच अनेक कंपनीज भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या कार्स लाँच करत असतात.
ह्युंदाई कंपनी गेली अनके वर्षे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी आपल्या दमदार कार्ससाठी ओळखली जाते. कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्तमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असतात. नुकतेच त्यांनी SUV सेगमेंटमध्ये Creta ची नाइट एडिशन लाँच केली आली आहे.
या एसयूव्हीच्या नव्या एडिशनमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत, इंजिन किती पॉवरफुल आहे? ते कोणत्या किंमतीला खरेदी केले जाऊ शकते? पुढे आपण जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: Electric bicycle खरेदी करण्याचा विचार आहे? मग ध्यानात ठेवा ‘या’ गोष्टी
Hyundai द्वारे SUV सेगमेंटमध्ये ऑफर केलेली Creta ची नाइट एडिशन भारतात लाँच करण्यात आली आहे. या एडिशनमध्ये 21 स्पेशल बदल करण्यात आले आहेत जे ब्लॅक कलरमध्ये ऑफर केले जात आहेत. त्याची फेसलिफ्ट व्हर्जन जानेवारी 2024 मध्येच लाँच झाली होती आणि आता सणासुदीच्या आधीच कंपनीने SUV ची नवीन व्हर्जन बाजारात आली आहे.
एसयूव्हीच्या नाईट एडिशनमध्ये फ्रंट रेडिएटर ग्रिलमध्ये काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्या पुढील आणि मागील स्किड प्लेट्स, साइड सिल गार्निश, रूफ रेल, सी-पिलर गार्निश, ORVMs, स्पॉयलर आणि 17-इंच अलॉय व्हील देखील त्याच रंगात ठेवण्यात आले आहेत. एसयूव्हीचा लोगो मॅट ब्लॅक कलरमध्ये देण्यात आला आहे, जो खूप स्टायलिश दिसतो.
Hyundai Creta Knight Edition चे इंटीरियर देखील याच थीमवर ठेवण्यात आले आहे. SUV च्या इंटीरियरला ब्रास कलर इन्सर्टसह ऑल ब्लॅक थीम देण्यात आली आहे. जे स्टिचिंग, स्टीयरिंग व्हील आणि मेटल पेडल्ससह अनेक पार्ट्सवर पाहिले जाऊ शकते. एकंदरीत कंपनीने ब्लॅक कलर थीमवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे.
या नवीन SUV मध्ये 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे ज्यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. दुसरा इंजिन पर्याय म्हणून, त्यात 1.5 लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन उपलब्ध आहे. नाइट एडिशन केवळ S आणि SX पर्यायी व्हेरियंटसमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
Hyundai या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.50 लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत त्याच्या पेट्रोल इंजिन S पर्यायी मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारासाठी आहे. पेट्रोलमधील या एडिशनच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 18,88,200 रुपये आहे.
डिझेल इंजिन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 16.08 लाख ते 20.15 लाख रुपये आहे. जर ग्राहकांनी ही कार टायटन ग्रे मॅट कलर पर्यायाने खरेदी केली तर त्याला अतिरिक्त 5,000 रुपये द्यावे लागतील. ड्युअल टोन पर्यायासाठी, तुम्हाला 15,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.