टॅक्स कमी झालाच तर किती असेल Tata Nexon ची किंमत? (फोटो सौजन्य: iStock)
अनेकदा कार्सच्या जाहिरातीत आपल्याला एक्स शोरूम किंमत दाखवली जाते. मात्र, जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला ऑन रॉड किमतीत कार खरेदी करावी लागते. यावेळी कारच्या एक्स शोरूम आणि ऑन रोड किमतीत मोठा फरक जाणवतो. खरंतर ऑन रोड किमतीत आपल्याला त्या कारवरील टॅक्स द्यावा लागतो. अशातच एक आनंदाची बातमी मिळाली आहे आणि ती म्हणजे केंद्र सरकार येत्या दिवाळीत छोट्या कार्सवरील GST कमी करू शकते. अद्याप यावर शिकामोर्तब झाले नाही.
भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या कार्सची सर्वाधिक विक्री होत असते. नुकतेच 15 ऑगस्टच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जीएसटी सुधारणेबाबत काही वक्तव्य केले, ज्याअंतर्गत सरकार आता लहान कार्सवरील टॅक्स कमी करण्याच्या तयारीत दिसत आहे.
दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
सध्या 1200cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या आणि 4 मीटरपेक्षा लहान कार्सवर 28 टक्के जीएसटी व 1 टक्के सेस आकारला जातोय. मात्र, प्रस्तावित बदलानुसार हा टॅक्स 18 टक्के जीएसटी व 1 टक्के सेस इतका होणार आहे. अशा परिस्थितीत जर टॅक्स कमी झालाच तर टाटा नेक्सॉनच्या किंमतीवर याचा नेमका किती परिणाम होईल, त्याबद्दल जाणून घेऊयात.
सध्यातरी टाटा नेक्सॉनची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. आता वाहनावर 28% जीएसटी आणि 1% सेस लागू आहे. जर हा टॅक्स 18% जीएसटी आणि 1% सेस झाला, तर टाटा नेक्सॉनची सुरुवातीची किंमत सुमारे 7.19 लाख रुपये होईल. मात्र, ऑन-रोड किमतीत रोड टॅक्स, विमा आणि इतर शुल्क देखील समाविष्ट असतील, त्यामुळे प्रत्यक्ष किंमत थोडी वेगळी असू शकते.
Tata Nexon ही नेहमीच आपल्या पॉवर आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. यात 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 120bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क निर्माण करते. तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.5-लिटर इंजिन आहे, जे 110bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते.
नवीन Renault Kiger चा टिझर रिलीज, ‘हे’ नवीन फीचर्स मिळू शकतात पाहायला?
कंपनीने Tata Nexon चे इंटिरिअर अत्यंत प्रीमियम आणि आधुनिक ठेवले आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. याशिवाय, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, हाइट-ऍडजस्टेबल फ्रंट सीट, क्रूज कंट्रोल आणि JBL साउंड सिस्टमसारखी आधुनिक फीचर्सही यात दिली आहेत.
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी Tata Nexon मध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. यात 6 एअरबॅग्स, ABS, हिल-असिस्ट आणि 360-डिग्री कॅमेरासारखे ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स दिले आहेत. त्यामुळेच या कारला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.