
फोटो सौजन्य: Social Media
पूर्वी एखादी महागडी गोष्ट खरेदी करताना पूर्ण पैसे द्यावे लागायचे ज्यामुळे कित्येक जणांना ती गोष्ट खरेइड करता येत नव्हते. परंतु आज ईएमआयमुळे अनेक जणांना आपल्या बजेटच्या बाहेरील वस्तू खरेदी करता येतात. ईएमआयमध्ये आपल्याला दर महिन्याला एक ठराविक रक्कम ठराविक वर्षापर्यंत जमा करावी लागते. म्हणूनच तर अनेक जण आपले बजेट कमी असताना सुद्धा महागड्या वस्तू ईएमआयच्या सहाय्याने खरेदी करतात.
हल्ली अनेक जण ईएमआयच्या मदतीने कार विकत घेत असतात. दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia Motors ने भारतीय बाजारात सर्वात स्वस्त एसयूव्ही Kia Sonet आणली आहे. किफायतशीर असण्यासोबतच, या कारमध्ये चांगले फीचर्स देखील आहेत, ज्यामुळे ती भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय ठरते. ही कार तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममधून खरेदी करू शकता. तसेच तेथे आकर्षक ऑफर्स सुद्धा मिळवू शकता.
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Maruti Grand Vitara तुमची, फक्त भरावा लागेल एवढा EMI
जर तुम्ही सर्वोत्तम SUV च्या शोधात असाल तर किया सोनेट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Kia Sonet च्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत 8.98 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची ऑन-रोड किंमत 18.61 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलूही शकते.
जर तुम्ही या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे बेस मॉडेल 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी केले तर तुम्हाला बँकेकडून अंदाजे 7.98 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज तुम्हाला 9.8 टक्के व्याजदराने 4 वर्षांसाठी मिळेल. प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगळा असू शकतो.
Royal Enfield ची अजून एक बाईक मार्केटमध्ये हवा करण्यास सज्ज, जाणून घ्या किंमत
किया सोनेट एक लाखाच्या डाउन पेमेंटसह खरेदी केली तर तुमचा ईएमआय सुमारे 20 हजार रुपये असेल. जर तुमचा पगार 70 हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करू शकता. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कर्ज व व्याजदर देखील बँक आणि फायनान्स कंपनीवर अवलंबून असतात.
ही किया कार अनेक फीचर्सनी सज्ज आहे. यात 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय या कारमध्ये 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही बसवण्यात आला आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जरची सुविधाही आहे. ही कार खरेदी करणे हा फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या कुटुंबासाठी देखील उत्तम निर्णय असू शकतो.