Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

130 च्या स्पीडने गाडी चालवली तर होणार FIR दाखल! ‘या’ राज्य सरकारचा निर्णय

आता ताशी 130 किलोमीटरच्या पुढे वेगाने गाडी चालविल्यास वाहनचालकावर FIR दाखल केली जाणार आहे. गुरुवार 1 ऑगस्टपासून हा नियम अमलांत आणला जाणार आहे. जास्त वेगाने चालविलेल्या गांड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  

  • By नारायण परब
Updated On: Jul 29, 2024 | 09:44 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

आता ताशी 130 किलोमीटरच्या पुढे वेगाने गाडी चालविल्यास वाहनचालकावर FIR दाखल केली जाणार आहे. गुरुवार 1 ऑगस्टपासून हा नियम अमलांत आणला जाणार आहे. कर्नाटकात कुठेही 130 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास  एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. असे एका वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. जास्त वेगाने चालविलेल्या गांड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक आणि रस्ता सुरक्षा) आलोक कुमार म्हणाले की, “1 ऑगस्टपासून, निष्काळजीपणाने आणि धोकादायक ड्रायव्हिंगच्या आरोपाखाली कर्नाटकात कुठेही 130 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर FIR दाखल केली जाणार आहे,” पीटीआयशी बोलताना, आलोक कुमार यांनी स्पष्ट केले की, भारतीय न्याय संहिता (BNS) – 281 अंतर्गत रॅश आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंगसाठी, एकदा वेग मर्यादा 120 किमी प्रतितास ओलांडली की ते रॅश किंवा धोकादायक ड्रायव्हिंग होते.

या महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील NICE (नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर एंटरप्राइझ) रस्त्यावर झालेल्या अपघाताबाबत सांगताना ते  म्हणाले की,  या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता,  अपघातातील वाहन ताशी 160 किमी वेगाने चालवले जात होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षेवरील देखरेख समितीने अपघाताची दखल घेतली आणि राज्य सरकारला कळवले की वाहने  वेगाने चालवणे वाढले आहे आणि त्यामुळे जीवितहानी होत आहे.

ते म्हणाले, “वर्ष 2022 मध्ये, कर्नाटकात 90 टक्के (अपघातात) मृत्यू हे अतिवेगामुळे (अपघात) होतील.अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेख समितीने आम्हाला याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले. या दिशेने आम्ही हा नियम  आणला आहे. ताशी 130 किमीपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करणे हे खरे आव्हान असेल, परंतु आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू.”

नियमाच्या परिणामाबाबत कुमार म्हणाले की,  “नवीन नियमाचा सर्वांवर परिणाम होईल आणि ते फक्त महामार्गांपुरते मर्यादित असणार नाही. इतर ठिकाणीही आम्ही स्पीड लेजर गनचा उपयोग करत आहोत. आम्ही 155 स्पीड गन वितरित केले आहेत .”

Web Title: If you drive at a speed of 130 an fir will be filed decision of karnataka state govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • Driving Rules

संबंधित बातम्या

Ola-Uber ड्रायव्हर होण्याचा विचार करताय? कंपनी लवकरच लागू करणार ‘हा’ नियम
1

Ola-Uber ड्रायव्हर होण्याचा विचार करताय? कंपनी लवकरच लागू करणार ‘हा’ नियम

दुचाकीस्वारांनो लक्ष द्या ! केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ‘या’ निर्णयाला दिली मंजुरी
2

दुचाकीस्वारांनो लक्ष द्या ! केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ‘या’ निर्णयाला दिली मंजुरी

वाहन चालकांनो, कोणता नियम मोडल्यास किती हजारांचा दंड बसतो? जाणून घ्या पूर्ण माहिती
3

वाहन चालकांनो, कोणता नियम मोडल्यास किती हजारांचा दंड बसतो? जाणून घ्या पूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.