फोटो सौजन्य- iStock
हिवाळा सुरु झाला असून या काळात कारसंबंधी सर्वात सामान्य समस्या उदभवू शकते ती म्हणजे कार लगेच स्टार्ट न होणे. त्यामुळे तुम्हाला प्रवास सुरु करण्याच्या अगोदर काही कालावधी हा कार स्टार्ट करण्यासाठी द्यावे लागतो. तसेच अनेकदा थंडीच्या काळात कारच्या बॅटरी आणि इंजिन परफॉर्मंन्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो. मात्र काही टिप्सचा अवलंब केल्यास तुम्ही त्वरीत कार स्टार्ट करु शकता. जाणून घेऊया टिप्स
कार त्वरीत सुरु होण्यासाठी टिप्स
कार वॉर्म-अप
कार सुरु केल्यानंतर, ती काही सेकंदासाठी चालू ठेवा त्यामुळे कारचे इंजिन गरम होते. या प्रक्रियेला वॉर्म अप म्हटले जाते. मात्र ही प्रक्रिया जास्त वेळ केल्यास इंधन वाया जाते. त्यामुळे मर्यादित कालावधी करिता वार्म अप करा.
इंजिन ऑन करा
कार स्टार्ट करण्यापुर्वी एक दोन वेळा इग्रिशनमध्ये चावी थोडीशी फिरवा त्यामुळे बॅटरी थोडी गरम होईल आणि इंजिनमध्ये इंधन पोहचू शकेल. त्यानंतर काही सेकंदामध्ये कार स्टार्ट करा. कार लगेच सुरु होईल.
बॅटरीची नियमित तपासणी
थंडीच्या काळात बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे तुमची बॅटरी ही चांगल्या स्थितीमध्ये आहे की नाही हे तपासून घ्या. बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर बदलून घ्या.
कार स्टार्ट करताना क्लच दाबा
कल्च दाबून कार सुरु केल्याने बॅटरीवर पडणारा दबाव हा कमी असतो. त्यामुळे इंजिनही लवकर सुरु होते. म्यॅनुअल ट्रासिंशन कारमध्ये याचा जास्त फायदा होतो.
इंजिन ऑईल
थंडीचा परिणाम इंजिन ऑइलवर होतो. इंजिन ऑइल घट्ट होते त्यामुळे इंजिनसंबंधी समस्या निर्माण होते. याकरिता चांगले गुणवत्ता असलेले इंजिन ऑइलची निवड करणे आवश्यक आहे. ज्यामुळे इंजिन ऑइलसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात.
ब्लॉक हीटर वापरा
जर तुम्ही खूप थंड भागामध्ये राहत असाल तर इंजिन ब्लॉक हीटर वापरा. हे इंजिन ब्लॉक हीटर इंजिन गरम ठेवते. आणि कार लवकर सुरू होते.
कार बंद जागेत पार्क करा
हिवाळ्यामध्ये शक्य असल्यास कार बंद जागेत पार्क करा. बंद जागेमध्ये थंड हवेचा प्रभाव कमी होतो आणि इंजिन थंड पडण्यापासून काही प्रमाणात सुरक्षित राहते. बंद जागा नसल्यास अशा जागेत पार्क करा ज्याठिकाणी हवा थेट कारपर्यंत पोहचणार नाही.
वरील टिप्सचा अवलंब केल्यास तुमची कार त्वरीत स्टार्ट होईल. तसेच कारची नियमित सर्व्हिंसिंग करणे हे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही चिंतामुक्त प्रवास करु शकतात.