फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातील सर्वात लोकपिय कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (Maruti Suzuki India Limited) कडून सोमवारी ( दि. 5 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आले की, त्यांनी त्यांच्या लोकप्रिय डिझायर (Dzire) मॉडेलच्या चौथ्या जनरेशनच्या बुकिंग स्वीकारण्यास 11 नोव्हेंबर सुरुवात केली आहे.कंपनीच्या अधिकृत निवेदनात कंपनीने नमूद केले की, नवीन डिझायर त्याच्या प्रगतीशील डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्तम मूल्य प्रस्तावासह कॉम्पॅक्ट सेडान विभागात एक नवीन मानक स्थापित करेल.
केवळ 11 हजार रुपयांमध्ये बुकिंग
ग्राहक जवळच्या मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये किंवा ऑनलाइन फक्त 11000 रुपयांमध्ये या न्यू डिझायरचे बुकिंग करु शकतात. मारुती डिझायरचे लॉंचिंग येत्या सोमवारी दि. 11 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कारची एक्स शो रुम किंमत ही 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. मारुती सुझुकी डिझायरमध्ये सनरूफस असणार आहे. तसेच या कारमध्ये एक रिफ्रेश इंटीरियर मिळेल. कारमध्ये मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह पेट्रोल इंजिनसह पॉवरट्रेन पर्याय सारखेच राहतील. कारचे सीएनजी मॉडेल सादर केले जाणार का? हे लवकरच कळेल.
कंपनीने म्हटले आहे की, “मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL), भारतातील आघाडीची प्रवासी वाहन उत्पादक कंपनीने आज ( दि. 4 नोव्हेंबर 2024) ला त्यांच्या अत्यंत अपेक्षित चौथ्या जनरेशन डिझायरसाठी बुकिंग सुरू केले आहे.” मारुती सुझुकीची डियायर ही कार कंपनी साठी सर्वाधिक विक्री होणारी कार आहेच त्यासोबत या कारचा भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेतही दबदबा आहे. डिझायरचे लाखो ग्राहक असून कारची लोकप्रियता अबाधित आहे. आता येणाऱ्या चौथ्या जनरेशनच्या मॉडेल लॉंचिंगमुळे ग्राहकांना एक नवीन कारचा पर्यांय उपलब्ध होणार आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, ऑल-न्यू डिझायरने बाजारपेठेत एक मोठे पाऊल पुढे टाकण्याचे वचन दिले आहे, मारुती सुझुकीने कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे डिझायरचे नवीनतम मॉडेल भारतीय ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करणारे असणार आहे.
नवी डिझायर ही या विभागातील सर्वोत्तम नाही तर पारंपारिक अपेक्षांच्या पलीकडे
मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि विक्रीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी म्हणाले की, “2008 पासून Dzire च्या असाधारण प्रवासामुळे 27 लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकून ही कार भारताची आवडती सेडान बनली आहे. ऑल-न्यू डिझायरसह, आम्ही असे काहीतरी तयार केले आहे जे केवळ त्याच्या विभागातील सर्वोत्तम नाही तर पारंपारिक अपेक्षांच्या पलीकडे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “त्याचे आधुनिक डिझाइन, उत्कृष्ट आराम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहकांना डिझायरबद्दल काय आवडते आणि आधुनिक सेडानमध्ये त्यांना काय हवे आहे याचे परिपूर्ण संश्लेषण दर्शवते. विचारपूर्वक क्युरेट केलेल्या वैशिष्ट्यांसह प्रगत पॉवरट्रेन पर्याय एकत्र करून, ऑल-न्यू डिझायर एक अपवादात्मक अनुभव देण्यासाठी तयार आहे.”