फोटो सौजन्य: Freepik
सध्याच्या वाढत्या उकाड्यामुळे लोकं कारमध्ये गेल्या गेल्या एकवेळ सीट बेल्ट्स नाही लावणार पण एसी नक्कीच लावणार. पण अनेकदा, एसीच्या वापरामुळे कारच्या मायलेजवर परिणाम होत असल्यामुळे काही कारचालक एसीच लावत नाही. पण जर तुम्हाला एसी लावायची योग्य पद्धत माहित असेल तर नक्कीच तुमच्या कारचा मायलेज वाढू शकतो. खाली काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही कारचा एसी लावून सुद्धा ड्रायविंगचा आनंद घेऊ शकता. चला याबाबद्दल जाणून घेऊया.
कार पार्क करताना तिला नेहमी सावलीत ठेवत जा किंवा एखाद्या शेडचा वापर करा जेणेकरून कारच्या आतील तापमान जास्त वाढणार नाही. जेव्हा कार खूप गरम होते, तेव्हा एसीला कार थंड करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. परिणामी, इंधनाचा वापर अधिक वाढतो.
हे देखील वाचा: हिवाळा सुरु होण्याअगोदर बाईकमध्ये करून घ्या ‘ही’ 5 कामं, मग बघा कशी सुसाट धावेल बाईक
एसी नेहमी फुल ब्लास्टवर चालवू नका. पहिली काही मिनिटे एसी मध्यम सेटिंगवर चालवा आणि कार थंड झाल्यावर फॅन स्पीड कमी करा. यामुळे इंधनाचा वापर कमी होईल.
कार थंड झाल्यावर एसीमध्ये रिसर्कुलेशन मोड वापरा. यासह, एसी बाहेरून गरम हवेऐवजी आधीच थंड हवा प्रसारित करेल, ज्यामुळे एसीची कार्यक्षमता वाढेल आणि इंधनाचा वापर कमी होईल.
एसी फिल्टरची नियमित स्वच्छता आणि देखभाल करत रहा. डर्टी फिल्टरमुळे एसी वर जास्त ताण येतो आणि इंधनाचा वापर वाढतो.
एसी चालू असताना, कारच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवा जेणेकरून थंड हवा बाहेर पडणार नाही आणि एसीला कूलिंग करण्यास कमी कष्ट करावे लागतील.
तुम्ही शहरात हळू चालत असाल तर एसी बंद ठेवा आणि खिडक्या उघडा. पण हायवेवर जास्त वेगाने गाडी चालवताना खिडक्या बंद करा आणि एसी चालवा, कारण उघड्या खिडक्यांमुळे एरोडायनॅमिक ड्रॅग वाढतो. त्याचसोबत इंधनाचा वापर वाढतो.
कारच्या आतील भाग खूप थंड असण्याची गरज नाही. 22-24 अंश तापमान ठीक आहे जे थंडपणा देईल आणि इंधनाचा वापर कमी करेल.
या सर्व पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमच्या SUV किंवा कारमध्ये AC चा योग्य प्रकारे वापर करू शकता आणि मायलेजही वाचवू शकता.