येत्या १ एप्रिलपासून एक्स्प्रेस वे वरील टोलदरात ३ टक्क्यांनी वाढ
पूर्वी लोकांना टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी अनेक वेळा रांगेत ताटकळत राहावे लागे. यात पेट्रोल आणि वेळ दोन्ही वाया जात होते. कित्येक जण पैश्यांमुळे नव्हे तर या रांगेपासून वाचण्यासाठी कुठले तरी शॉर्टकट शोधून काढत होते. परंतु आता जेव्हापासून भारत सरकारने फास्टटॅग जारी केला आहे तेव्हापासून परिस्थती बदलली आहे.
फास्टटॅग आल्यापासून आज भारत कॅशलेस सिस्टिमकडे आपले पाऊल टाकत आहे. तसेच भारत सरकारसुद्धा नागरिकांना कॅशलेस पेमेंट्सबद्दल प्रोत्साहित करत आहे. काही वेळेस फास्ट टॅग मध्ये काही नवे नियम सुद्धा समाविष्ट करण्यात येतात जेणेकरून ही सुविधा अधिक सोयीस्कर व्हावी.
आता फास्टॅग नियमांबाबत अजून एक नवीन अपडेट समोर आली आहे. लोकांच्या सोयीसाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने फास्टॅग खात्याचा ई-मेंडेट फ्रेमवर्कमध्ये समावेश केला आहे. आता तुमच्या फास्टॅग खात्यातील पैसे संपले जरी असले तरीही तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या बँक खात्यातून आपोआप पैसे फास्टॅग खात्यात ट्रान्सफर होतील.
हे देखील वाचा: Tata Nexon CNG लवकरच लॉंच होणार, ही कार असणार देशातील पहिली टर्बोचार्ज्ड CNG SUV
भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवार, 22 जानेवारी रोजी ई-मेंडेट फ्रेमवर्कमध्ये काही बदल केले आहेत. या बदलामुळे फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) मध्ये ऑटोमेटिक रिचार्जचा नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम या ई-मेंडेट फ्रेमवर्कमध्ये देण्यात आला आहे.
या नियमानुसार, तुमच्या ज्या बँक खात्यातून फास्टॅग खात्यात पैसे जोडले जातात, त्या बँकेशी लिंक असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर वापरकर्त्याला 24 तास अगोदर एक सूचना मिळेल. त्यानंतरच ग्राहकाच्या खात्यातून पैसे कापले जातील.
या नवीन नियमानुसार, तुम्हाला तुमच्या फास्टॅग खात्यातील रकमेची किमान मर्यादा निश्चित करावी लागेल. तुम्ही ही मर्यादा गाठताच तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील व नंतर ते तुमच्या फास्टॅग खात्यात आपोआप जोडले जातील. यामुळे रिचार्ज न केल्यावरही लोकांच्या फास्टॅग खात्यात पैसे राहतील व त्यांचा वेळ वाचेल.
यापूर्वीही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन अपडेट जारी केले होते. या नियमांतर्गत फास्टॅग वापरकर्त्याच्या खात्याला जर पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झाला असल्यास, त्याचे खाते त्याने बदलणे आवश्यक आहे.
याशिवाय ज्या फास्टॅग वापरकर्त्याच्या खात्यात तीन वर्षे पूर्ण झाली असतील तर त्याने पुन्हा KYC करणे अवषयक आहे. तसे न केल्यास युजरचे खाते ब्लॅक लिस्ट केली जाईल. केवायसी करण्यासाठी सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.