Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या कोंडीनंतर 1.2 लाख वाहनचालकांना टोल परतावा; 5.16 कोटी रुपये फास्टॅग खात्यात जमा होणार

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील टोल परतावाही लागू.प्रशासनाकडून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे आश्वासन.

  • By Dilip Bane
Updated On: Feb 23, 2026 | 03:16 PM
Mumbai-Pune Expressway toll refund

Mumbai-Pune Expressway toll refund

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर 3 फेब्रुवारी रोजी गॅस टँकर अपघातानंतर 32 तासांची वाहतूक कोंडी.
  • सुमारे 1.2 लाख वाहनचालक प्रभावित.
  • एकूण ₹5.16 कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय.
  • परतावा थेट वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यात जमा होणार.
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून डेटा संकलन पूर्ण.
  • टोल वसुली थांबवण्याचे आदेश असूनही काही व्यवहार स्वयंचलित प्रणालीमुळे झाले
पुणे, नवभारत न्यूज नेटवर्क. 3 फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर तब्बल 32 तास लागलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रभावित झालेल्या किमान 1.2 लाख वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व वाहनचालकांना लवकरच टोल परतावा मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे 5.16 कोटी रुपयांची रक्कम या वाहनचालकांना परत करण्यात येणार आहे. हा परतावा एक्सप्रेसवेवरील तसेच पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वसूल करण्यात आलेल्या टोलसाठीही लागू असेल.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातानंतर टोल वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीदेखील ज्या वाहनचालकांच्या फास्टॅगमधून रक्कम वजा झाली, त्यांचा डेटा संकलित करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात ही रक्कम थेट संबंधित वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यात जमा केली जाणार आहे.या घटनेनंतर महामंडळाने आपल्या कन्सेशनायर IRB Infrastructure कडून सविस्तर माहिती मागवली होती. विशेषतः वाहनचालकांना परतावा देण्यास प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.

FASTag चा वार्षिक पास घेऊ की सतत रिचार्ज करत बसू, काय आहे फायदेशीर?

3 फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ गॅस टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हजारो वाहने अनेक किलोमीटर लांब रांगांमध्ये अडकली होती. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांशिवाय तासन्तास थांबावे लागले. या परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने टोल वसुली तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे की, प्रभावित वाहनचालकांना त्यांचा परतावा देणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल.अधिकाऱ्यांचे मत आहे की, टोल प्लाझाचे बॅरिअर पूर्णपणे उघडले जाण्यापूर्वी काही लेन-देन स्वयंचलित प्रणालीमुळे झाले असावेत, ज्यामुळे काही वाहनचालकांच्या फास्टॅगमधून रक्कम वजा झाली असण्याची शक्यता आहे.

FASTag चा ‘हा’ नवीन नियम जाणून घ्या, टोल नाक्यावर नाही लावावी लागेल रांग

Web Title: Mumbaipune expressway toll refund 16 crore to be credited to fastag accounts after 32 hour traffic jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • fast tag
  • MSRDC
  • Pune Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.