
फोटो सौजन्य: YouTube
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात रोज नवीन वाहनं लाँच होताना दिसत आहे. यात फक्त कार्सचं नव्हे तर बाईक्स आणि स्कुटर्सचा सुद्धा समावेश आहे. खरंतर वाहनं आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जातात. काही जण आपल्या कुटुंबासाठी वाहनं खरेदी करत असतात तर काहींचा उदरनिर्वाह या वाहनांवर होत असते.
तुम्ही एलसीव्ही सेगमेंट वाहनांबद्दल ऐकले आहे का? जर नसेल तर आम्ही सांगतो त्याबद्दल. एलसीव्ही सेगमेंट मढी वाहने ही अशी वाहने असतात ज्यांचा उपयोग हलक्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी होतो. जास्तकरून या अशा वाहनांचा उपयोग लॉजिस्टिक कंपनीज जास्त करताना दिसतात.
नुकतेच देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कमर्शियल वाहन सेगमेंटमध्ये एक नवीन वाहन लाँच केले आहे. महिंद्र वीरो एलसीव्ही असे या या नवीन वाणाचे नाव आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
कंपनीने या नवीन वाहनाला तीन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. यामध्ये ड्रायव्हर सीट स्लाइड आणि रिक्लाइन तसेच फ्लॅट फोल्ड सीट्स, डोअर आर्म-रेस्ट, मोबाइल डॉक, पियानो ब्लॅक क्लस्टर बेझल, ड्रायव्हर एअरबॅग, हीटर आणि एसी, फास्ट चार्जिंग यूएसबी सी-टाइप, 26.03 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, यांचा समावेश आहे. स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, पॉवर्ड विंडो यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
कंपनीने हे नवीन वाहन डिझेल आणि सीएनजीच्या पर्यायासह आणले आहे. ज्यामध्ये 1.5-लिटर mDI डिझेल इंजिन दिलेले आहे जे 59.7 kW चा पॉवर आणि 210 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. CNG सह उपलब्ध असलेले इंजिन 67.2 kW ची शक्ती आणि 210 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते.
महिंद्राचे हे वाहन सीबीसी, स्टँडर्ड डेक आणि हाय डेक कार्गोसाठी डिझाइन केलेले आहे, ज्याची साइज XL 2765 mm आणि , XXL 3035 mm इतकी आहे. त्याची डिझेलमध्ये भार उचलण्याची क्षमता 1.6 टन आणि 1.55 टन आहे, तर CNG व्हर्जनची क्षमता 1.5 टन आणि 1.4 टन आहे.
महिंद्राने या नवीन वाहनाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये ठेवली आहे, ज्यात V2 CBC XL हा व्हेरियंट उपलब्ध आहे. तर त्याच्या V6 SD XL व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.56 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.