फोटो सौजन्य - Social Media
भारतीय वाहन क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड महिंद्रा आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवे पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी, चेन्नई येथे होणाऱ्या ‘अनलिमिट इंडिया वर्ल्ड प्रीमियर’मध्ये महिंद्राने ‘इन्ग्लो आर्किटेक्चर’वर आधारित इलेक्ट्रिक एसयूव्ही ब्रँड्स, एक्सईव्ही आणि बी सादर करण्याची घोषणा केली आहे. या नव्या ब्रँड्स अंतर्गत महिंद्राची दोन प्रमुख इलेक्ट्रिक मॉडेल्स – ‘XEV 9e’ आणि ‘BE 6-e’ची जगभरातील बाजारात घोषणा होणार आहे.
हे देखील वाचा : कम्फर्ट आणि मायलेज, दोन्ही हवे असल्यास ‘या’ कार्सपेक्षा दुसरा बेस्ट पर्याय नाही
महिंद्राने भारतीय तत्त्वांनुसार आणि जागतिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इन्ग्लो आर्किटेक्चर’ तयार केले आहे. या आर्किटेक्चरमध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन स्मार्ट व नवकल्पनांचा समावेश केला आहे, जे अत्यंत सुरक्षितता, उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि इंधन कार्यक्षमता प्रदान करते. हे आर्किटेक्चर तयार करताना वाहन चालकांना सहज व आनंददायी अनुभव मिळावा, यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. महिंद्राचा उद्देश आहे की भारतीय ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून आकर्षक आणि उत्कृष्ट अनुभव मिळावा.
‘XEV 9e ब्रँड हा इलेक्ट्रिक लक्झरीची परिभाषा मांडतो. ही SUV अत्याधुनिक तंत्रज्ञानासह विविध लक्झरी वैशिष्ट्ये देते. स्मार्ट ड्रायव्हिंग सुविधांपासून ते आकर्षक डिझाइनपर्यंत या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामध्ये हाय-एंड फिचर्सची भर असून, भारतीय ग्राहकांना एक लक्झरी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळवून देण्याचा महिंद्राचा मानस आहे.
दुसरीकडे, ‘बी ई ६-ई’ हा ब्रँड एका धाडसी आणि अॅथलेटिक एसयूव्हीचे प्रतिनिधित्व करतो. हे मॉडेल वेगवान आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी तयार करण्यात आले आहे. स्पोर्टी लुक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबुतीच्या दृष्टीने ‘बी ई ६-ई’ला बाजारात एक खास स्थान मिळेल. महिंद्राने ‘बी ई ६-ई’च्या माध्यमातून ग्राहकांना एक असा पर्याय दिला आहे, ज्यात वेग आणि कार्यक्षमता दोन्ही मिळू शकेल.
महिंद्राचे हे दोन्ही मॉडेल्स जागतिक स्तरावर बाजारातील स्पर्धकांना टक्कर देण्यास सज्ज आहेत. भारतीय बाजारात एक अभिनव पर्याय म्हणून या वाहनांची वाट पाहिली जात आहे. महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही इको-फ्रेंडली, कार्यक्षम आणि दर्जेदार अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याचे फीचर्स नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस येणार आहे.
हे देखील वाचा : प्रचंड वेगाने उड्डाण घेणारे जेट विमान थांबते तरी कसे? जाणून घ्या त्याच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल
अधिक माहितीसाठी महिंद्राने दोन पर्याय दिले आहेत. या वाहनांचा पहिला टिझर यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. उमेदवारांनी त्या गोष्टींचा आढावा घेण्यात यावा. तसेच या गाड्यांच्या सखोल माहीतरीला जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी mahindraelectricsuv.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. सोशल मीडियावर महिंद्राला फॉलो करून या प्रीमियरबद्दल अद्ययावत माहिती मिळवा.