फोटो सौजन्य: iStock
विमानात बसण्याची प्रत्येकाचीच हौस असते. काही जण ही हौस लगेच पूर्ण करतात तर काहींना थोडा वेळ लागतो. विमानात बसून आकाशात एक दोन तास उडणे हा एक विलक्षण अनुभव असतो. एरवी गजबजलेले शहर आकाशातून मुंगी एवढे वाटू लागते. पण अनेकदा विमानात फिरताना काही प्रश्न पडत असतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे हवेत उडणाऱ्या जेट विमानात ब्रेक असतात का? चला याबद्दल जाणून घेऊया.
वरील प्रश्न तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल पण याचे उत्तर खूप सोपे आहे. जेट विमानातही ब्रेक असतात आणि ही ब्रेकिंग सिस्टीम असतात. फक्त ते कारपेक्षा अतिशय खास आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित असतात. जमिनीवर अतिवेगाने धावताना आणि हवेतून खाली उतरताना जेट विमानासाठी ब्रेक अत्यंत महत्त्वाचे असतात. जेट विमानाची ब्रेकिंग सिस्टीम कशी काम करते ते जाणून घेऊया.
हे देखील वाचा: कम्फर्ट आणि मायलेज, दोन्ही हवे असल्यास ‘या’ कार्सपेक्षा दुसरा बेस्ट पर्याय नाही
जेट विमानाच्या लँडिंग गिअरवरील टायर्समध्ये कारप्रमाणेच डिस्क ब्रेक असतात, जे विमान धावपट्टीवर उतरल्यावर त्याला थांबण्यास मदत करतात. हे ब्रेक बहुधा कार्बन-सिरेमिक किंवा स्टीलचे बनलेले असतात, ज्यामुळे ते जड विमानांना जास्त वेगाने फिरताना थांबवू शकतात आणि जास्त उष्णता सहन करू शकतात.
रिव्हर्स थ्रस्ट हे जेट इंजिनचे एक विशेष तंत्रज्ञान आहे, जे जेट विमानाची स्पीड वेगाने कमी करण्यास मदत करते. लँडिंगनंतर लगेच, पायलट इंजिनचे थ्रस्टर विरुद्ध दिशेने वळवतात, ज्यामुळे हवेचा जोर विमानाला मागे ढकलू शकते. या तंत्रज्ञानामुळे विमानाचा वेग लवकर कमी होतो आणि धावपट्टीवरचा ब्रेकवरील दाब कमी होतो.
विमानाच्या पंखांवर स्पॉयलर नावाचे भाग असतात, जे हवेचा फ्लो थांबवतात व जेट विमानाचा वेग कमी करतात. हे स्पॉयलर लँडिंगच्या वेळी पंखांवर उठतात, जे हवेचा प्रतिकार वाढवतात आणि विमानाचा वेग कमी करतात. धावपट्टीवर उतरताना पायलटकडून एरोडायनॅमिक ब्रेक्सचाही वापर केला जातो, जेणेकरून विमान लवकर थांबू शकेल.
जेट प्लेनमध्ये अँटी-स्किड सिस्टीम देखील आहे, जी आपोआप टायरच्या घर्षणावर नियंत्रण ठेवते जेणेकरून ब्रेक लावताना विमानाचा टायर घसरणार नाहीत. ही सिस्टीम कारमधील अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) प्रमाणेच काम करते आणि लँडिंग दरम्यान जेट विमानाची स्टेबिलिटी राखते.
जेट विमानांचे ब्रेक हायड्रॉलिक पॉवरद्वारे चालवले जातात, ज्यामुळे ते अधिक शक्तिशाली आणि जलद प्रतिसाद देतात. हायड्रॉलिक सिस्टीममुळे पायलट अगदी कमी ताकदीनेही जेट विमानावर सहज नियंत्रण ठेवू शकतो.
जेट विमानाची ब्रेकिंग सिस्टीम अत्यंत महत्त्वाची असते, विशेषतः लँडिंगच्या वेळी. रिव्हर्स थ्रस्टर, व्हील ब्रेक्स आणि एरोडायनामिक ब्रेक्सचे कॉम्बिनेशन जेट प्लेनला सुरक्षितपणे आणि कमीत कमी वेळेत थांबवते.