फोटो सौजन्य: iStock
भारतात कार विकत घेताना एक गोष्ट आवर्जून पहिली जाते ती म्हणजे कारचा मायलेज. एवढेच काय कार घेतल्यानंतर अनेक जणांनी विचारलेला प्रश्न म्हणजे कार किती मायलेज देते? पण अनेकदा कार घेताना आपल्याला हवे तसे मायलेज देणारी कार मिळत नाही.
मारुती सुझुकी भारतात अनेक वर्षांपासून उत्तम मायलेज देणाऱ्या कार्स मार्केटमध्ये लाँच करत आहे. यामुळेच कंपनीच्या कार्स ग्राहकांकडून खूप पसंत केल्या जातात. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या सणासुदीत मारुती सुझुकीची चांगली कार घेण्याच्या विचारत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन कार्सबद्दल सांगणार आहोत ज्या चांगल्या मायलेज देण्याऱ्या कार्स म्हणून ओळखल्या जातात.
भारतीय बाजारपेठेत जर कोणतीही कार स्वस्त मानली जात असेल तर ती मारुती अल्टो K10 आहे. अल्टोची एक्स-शोरूम किंमत फक्त 3 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 5.96 लाख रुपयांच्या दरम्यान जाते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर Alto K10 चे पेट्रोल व्हेरियंट 24.39 ते 24.90 किमी प्रति लीटर मायलेज देते आणि CNG व्हेरियंट 33.40 ते 33.85 किमी प्रति किलो मायलेज देते.
कंपनीने मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये 1.0 लीटर 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 BHP च्या मॅक्स पॉवरसह 89 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यासह, हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.
हे देखील वाचा: एसयूव्ही सुद्धा देईल जबरदस्त मायलेज, आजच फॉलो करा ‘या’ Driving Tips
कंपनीने मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये 998 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 55.92 bhp च्या मॅक्स पॉवरसह 89 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, ही कार तुम्हाला सुमारे 23 किमी मायलेज देते. याशिवाय या कारचे सीएनजी व्हेरियंटही बाजारात उपलब्ध आहे. मारुती सुझुकी वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.33 लाख रुपयांपर्यंत जाते.
या कॉम्पॅक्ट हॅचबॅक कारमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन आहे. या कारच्या CNG व्हर्जनमध्ये, हे इंजिन केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते, जे 56.7PS ची पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते. ज्यामध्ये 60 लिटरची सीएनजी टाकी उपलब्ध आहे.
मारुती सेलेरियोचे पेट्रोल व्हेरियंट सुमारे 26 किमी प्रति लिटर मायलेज देते तर सीएनजी व्हेरियंट सुमारे 34 किमी प्रति किलो मायलेज देते. यात ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, एसी व्हेंट्स आणि म्युझिक कंट्रोल्ससह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखे फीचर्स आहेत.