फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवस रात्र झटत असतात. बघायला गेले तर कार्सच्या अनेक कॅटेगरी असतात ज्यात एसयूव्ही म्हणजेच स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल ही एक कॅटेगरी आहे.
एसयूव्हीमध्ये अतिशय शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. इतकेच नाही तर ते सामान्य कारच्या तुलनेत उत्तम ऑफ-रोडिंग क्षमतेने सुसज्ज आहेत. अनेक सेलिब्रेटीज तसेच राजकारणी मंडळी एसयूव्ही कार्स वापरताना दिसतात.
जेव्हा एखादी एसयूव्ही नवीन असते तेव्हा तिचा परफॉर्मन्स हा चांगलाच असतो. पण जसजसा वेळ जात राहतो, कार जुनी होऊ लागते, तेव्हा कारमध्ये अनेक समस्या दिसू लागतात. विशेषकरून कार मायलेज कमी देऊ लागते.
हे देखील वाचा: गेली अनेक दशके गाजवलेल्या ‘या’ बाईक्स आजही तरुणांना प्रेमात पाडतात
एसयूव्हीमध्ये इंधनाचा वापर सुद्धा जास्त होत असतो. अशा परिस्थितीत ही कार चालवणे महागडे ठरू शकते. जर तुम्ही SUV चे मालक असाल तर आज आम्ही तुम्हाला इंधनाचा वापर कमी करून मायलेज कसे वाढवू शकतो याबद्दल सांगणार आहोत.
तुमच्या SUV चे मायलेज सुधारण्यासाठी तुम्ही खालील सोप्या ड्रायव्हिंग टिप्स फॉलो करू शकता:
हळू आणि स्टेबल वेगाने कार चालवा: अचानक एक्सेलरेशन आणि ब्रेकिंगमुळे एसयूव्ही जास्त इंधन वापरू लागते. स्टेबल वेगाने गाडी चालवण्याचा प्रयत्न करा आणि एक्सेलरेशन हळू वापरा.
टायरचा प्रेशर तपासा: टायरमध्ये हवेचा प्रेशर योग्य ठेवल्याने इंधन कार्यक्षमता वाढते. आठवड्यातून एकदा तरी टायरचा प्रेशर तपासा.
सनरूफचा योग्य वापर करा: सनरूफ वापरताना हवेच्या प्रवाहाकडे लक्ष द्या. सनरूफ जास्त काळ उघडे ठेवल्याने वाऱ्याचा प्रतिकार वाढतो, ज्यामुळे इंधनाचा वापरही वाढतो. परिणाम कार कमी मायलेज देऊ लागते.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांमुळे कारचे नुकसान झाल्यास ‘असा’ मिळवा इंश्युरन्स क्लेम
तुमच्या कारची नियमित सर्व्हिसिंग करा: इंजिन ऑइल, एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग यासारख्या गोष्टींची नियमित तपासणी आणि देखभाल केल्याने इंजिन सुरळीत चालू राहते आणि इंधनाची बचत होते.
हाय गिअरमध्ये गाडी चालवा: हाय गिअरमध्ये गाडी चालवल्याने इंजिनला कमी कष्ट पडतात, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो. सतत गिअर बदलत राहिलात तर कारमधील इंजिन जास्त इंधन वापरेल.
एअर कंडिशनचा संतुलित वापर: एसीच्या अतिवापरामुळे इंधनाचा वापरही वाढतो, त्यामुळे ऋतूनुसार त्याचा वापर करा. जर बाहेरील हवा थंडगार असेल तर कारमधील एसी लावण्याऐवजी खिडक्या उघड आणि मोकळ्या हवेचा आनंद घ्या.
या सशक्त आणि सोप्या टिप्सचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या SUV चे मायलेज वाढवू शकता आणि ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव देखील घेऊ शकता.