फोटो सौजन्य: Social Media
फक्त देशातच नाही जगभरात इलेक्ट्रिक कार्स लाँच होताना दिसत आहे. ग्राहक सुद्धा या नवीन कार्सना भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे सुद्धा अनेक जण इलेक्ट्रिक कार्सकडे वळताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनं हे आगामी ऑटोमोबाइल क्षेत्राचे भविष्य असल्यामुळे अनेक कंपनीज ज्या आधी इंधनावर चालणाऱ्या कार्स उत्पादित करीत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनाकडे लक्ष देत आहे. यातीलच एक ऑटो कंपनी म्हणजे एमजी मोटर्स.
ब्रिटिश कार उत्पादक कंपनी एमजी भारतात अनेक सेगमेंटमध्ये उत्तम कार्स ऑफर करत असते. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच MG Cyberster EV लाँच होणार आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल माहिती जाणून घेऊया.
Skoda Kylaq च्या विविध व्हेरियंटनुसार किंमती जाहीर, ‘या’ ग्राहकांना मिळणार लिमिटेड ऑफरचा लाभ
MG भारतीय कार मार्केटमध्ये MG Cyberster EV लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे वाहन जानेवारी 2025 मध्ये देशात लाँच केले जाईल. ऑटो एक्स्पो 2025 मध्येच ही कार लाँच केली जाईल आणि काही काळानंतर विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल अशी अपेक्षा आहे.
एमजी सायबरस्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डिझाइन. हे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोनच लोक बसू शकतात. याशिवाय, याला बटरफ्लाय डोअर्स, लो स्लंग डिझाइन देण्यात आले आहे ज्यामुळे ती आकर्षक कार बनते. MG Cyberster EV मध्ये एलईडी हेडलाइट्स, 20 इंच अलॉय व्हील, कनेक्टेड टेल लॅम्प, ओपन रूफ, तीन स्क्रीन, आठ स्पीकर बोस ऑडिओ सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, सात इंच इंफोटेनमेंट सिस्टीम यासारख्या अनेक उत्कृष्ट फीचर्ससह ऑफर केली जाईल.
वाह काय कार आहे! Jaguar कडून Type 00 इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार सादर, मिळणार 700 KM रेंज
कंपनी या कारला 77kWh क्षमतेची बॅटरी देईल, जी पूर्ण चार्ज केल्यावर 500 किलोमीटरहून अधिकची रेंज देईल. त्यात दोन मोटर पर्याय दिले जातील. यामुळे या कारला 500 BHP ची पॉवर मिळेल आणि ही एवढी वेगवान इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे की ती फक्त पाच सेकंदात 0-100 किमी स्पीडने चालवता येते. कंपनीकडून रिअर व्हील ड्राईव्ह सिस्टिम देण्यात येणार आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटला 0-100 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी फक्त 3.2 सेकंद लागतात.
सध्या, कंपनी युरोपमधील अनेक देशांमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. भारतात लाँचच्या वेळी, ते CBU (Completely Built Up) म्हणून आणले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 50 ते 70 लाख रुपये असू शकते.