Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता देशभरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन कळणार, MG Motors ने लॉंच केले Ehub प्लेटफॉर्म

भारतामध्ये जेएसडब्लू एमजी (JSW MG) मोटर्सतर्फे EHub हा  युनिफाईड चार्जिंग प्लेटफॉर्म लॉंच करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रवासामध्ये गाडी चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन शोधता येणार. जाणून घेऊया या प्लॅटफॉर्मविषयी

  • By नारायण परब
Updated On: Aug 06, 2024 | 04:55 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

जेएसडब्लू एमजी (JSW MG) मोटर्सतर्फे भारतामध्ये EHub हा  युनिफाईड चार्जिंग प्लेटफॉर्म लॉंच करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे ज्यामुळे प्रवासामध्ये गाडी चार्ज करण्यासाठी देशात कुठेही चार्जिंग स्टेशन शोधता येणार आहे. या अ‍ॅपद्वारे विना अडथळा पेमेंट केले जाऊ शकते.

इलेक्ट्रीक स्टेशन कळणार त्यासोबतच पेमेंटही करता येणार

भारतामध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे मात्र चार्जिंग स्टेशनची उपलब्धता त्याचप्रमाणात वाढविणे महत्वाचे आहे. अथवा त्याचबरोबर नेमकी चार्जिंगची उपलब्धता कोणत्या ठिकाणी आहे हे वाहनचालकांना कळणे महत्वाचे आहे. याकरिताच भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रीक वाहनांसाठी Ehub अ‍ॅप हा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच गाडी चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या अ‍ॅपची गरजही या युनीफाईड अ‍ॅपमुळे राहणार नाही. या अ‍ॅपद्वारेच वाहनचालक पेमेंट करु शकतो. एमजीच्या या अ‍ॅपद्वारे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, अदानी, इवीआरइ, शेल, झेओन चार्जिंग इत्यादी कंपनीच्या इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचा वापर केला जाऊ शकतो.

एमजी (MG) आणि जिओने विकसित केला इनोव्हेटिव कनेक्टिविटी प्लॅटफॉर्म 

एमजी मोटर्स लवकरच एसयुव्ही कारमध्ये इनोव्हेटिव कनेक्टिविटी प्लॅटफॉर्म देणार असून हा प्लॅटफॉर्म कंपनीने जियोसोबत सयुंक्तरित्या बनविला आहे. या प्लेटफॉर्ममुळे ग्राहक कारमध्ये अनेक ओटीटी अ‍ॅपचा वापर करु शकतात तसेच अनेक प्रकारच्या गेम प्लेटफॉर्मचाही वापर करु शकतात.

Windsor EV लवकरच होणार लॉन्च

एमजी मोटर्स (MG Motors) नवीन CUV (crossover utility vehicle ) सेगमेंट Windsor EV लाँच करणार आहे. ही कार सप्टेंबर महिन्यात कंपनीकडून लॉन्च केली जाऊ शकते.एमजीने अलीकडेच या वाहनाचा नवीन व्हिडिओ टीझर जारी केला आहे, या टीझरमध्ये कार लेह लडाखमधील अत्यंत कमी तापमानात उंच उतारावरून बर्फाळ पर्वतापर्यंत सहज जाताना दाखवले आहे. या कारची थेट स्पर्धा XUV 400, Nexon EV, सारख्या वाहनांशी होईल.

Web Title: Mg motors has launched the ehub platform people will know the location of the charging stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 04:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.