फोटो सौजन्य: iStock
भारतीय ग्राहकांना नेहमीपासूनच बाईक चालवायला खूप आवडते. आज जिथे अनेक ऑटो कंपनीज बाईकच्या परफॉर्मन्सला मॅच करेल अशा स्कूटर लाँच करत असल्या तरी बाईकची क्रेज काही कमी झाली नाही. खासकरून तरुणाईमध्ये हाय परफॉर्मन्स बाईक भाव खाऊन जात आहे.
सध्या भारतात अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज आहेत ज्या दमदार दुचाकी मार्केटमध्ये उपलब्ध करून देत असतात. पण जेव्हा चर्चा स्वस्तात मस्त बाईक ऑफर करणाऱ्या कंपनीची होते तेव्हा फक्त एकच कंपनीचे नाव मनात येते ते म्हणजे हिरो मोटोकॉर्प.
Hero ने नुकताच ऑक्टोबर-2024 साठी बाईक आणि स्कूटरचा सेल्स रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गेल्या महिन्यात हिरोने दुचाकींची जबरदस्त विक्री केली असून कंपनी पुन्हा एकदा देशातील नंबर-1 दुचाकी कंपनी बनली आहे. ज्या कंपनीची बाईक सर्वाधिक विकली गेली आहे ती Hero Splendor आहे.
हे देखील वाचा: Maruti Fronx वर दोन लाखांचे डाउन पेमेंट केल्यास किती होईल EMI? जाणून घ्या
सणासुदीच्या हंगामात म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये Hero MotoCorp ने बाइक आणि स्कूटरच्या 6 लाख 79 हजार 91 युनिट्सची विक्री केली आहे. 2023 मध्ये हा आकडा 5 लाख 74 हजार 930 युनिट होता. कंपनीने वार्षिक आधारावर 18.12 टक्के वाढ नोंदवली आहे.
वार्षिक आधारासह कंपनीने मासिक आधारावरही वाढ नोंदवली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत कंपनीने एकूण 6 लाख 37 हजार 50 दुचाकींची विक्री केली होती. अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या विक्रीत 6.60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हिरोने स्कूटरपेक्षा बाईक्स जास्त विकल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये हिरोने 6 लाख 35 हजार 787 बाईक्सची विक्री केली, तर स्कूटरच्या केवळ 43 हजार 304 युनिट्सची विक्री झाली. कंपनीच्या विक्रीत सर्वात मोठा हातभार कोणी लावला असेल तर तो म्हणजे स्प्लेंडर बाईकने. ही बाईक कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाईक बनली आहे. Hero Splendor अनेक व्हेरियंटमध्ये येते.
Hero Splendor चा सर्वात स्वस्त व्हेरियंट Splendor Plus आहे, ज्याची किंमत 76 हजार 356 रुपये ते 77 हजार 496 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही बाईक 80.6 किमी प्रति लिटर मायलेज देते, ज्यामुळे ही बाईक सर्वसामान्यांची फेव्हरेट बाईक मानली जाते.
Hero Splendor Plus ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे. या बाईकमध्ये एअर कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, OHC इंजिन आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 5.9 kW ची शक्ती प्रदान करते आणि 6,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक 60 kmpl चा मायलेज देते. याची एक्स-शोरूम किंमत 75,441 रुपयांपासून सुरू होते.