Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या काळात बजाजकडून पल्सरच्या नव्या एडिशनचे लॉंचिग ! जाणून घ्या वैशिष्टये, किंमत

सणासुदीच्या काळात बजाजने त्यांच्या सर्वाधिक लॉकप्रिय बाईक ब्रॅंड असलेल्या पल्सरचे नवीन एडीशन लॉंच केले आहे. जाणून घ्या या बाईकच्या किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 21, 2024 | 09:05 PM
फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

Follow Us
Close
Follow Us:

ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे लॉंचिग कंपन्यांकडून केले जात आहे. या काळातच ग्राहक मोठ्या प्रमाणात वाहन खरेदीकडे वळत असल्याने  कंपन्या आपल्या  मॉडेल्स विशेषत: या कालावधीमध्ये लॉंच करतात. बजाजकडूनही त्यांच्या सर्वात गाजलेला बाईक ब्रॅंड पल्सरची नवीन एडिशन बाजारात आणली आहे.   Bajaj Pulsar N125- ही सर्वात लहान N सीरीजची बाईक भारतात लाँच झाली आहे. या  बाईकच्या बेस व्हेरिएंटची किंमत  94,707 रुपयांपासून सुरू होते तर बाईकच्या ब्लूटूथ व्हेरिएंटची किंमत 98,707 रुपये आहे.

बजाज पल्सर N125 इंजिन (Bajaj Pulsar N125)

बजाज पल्सर N125 मध्ये 124.58cc, सिंगल-सिलेंडर मोटर आहे जी एअर-कूल्ड आहे. बजाजची ही 5वी 125cc मोटरसायकल आहे. नवीन 125cc इंजिन 8500 rpm वर 12hp ची कमाल पॉवर आणि 6000rpm वर 11Nm टॉर्क देते. बाईकच्या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.

हे देखील वाचा-मारुतीच्या ‘या’ कारला फक्त भारतात नव्हे तर सातासमुद्रापारही मागणी, निर्यात 355 टक्क्यांनी वाढली

बजाज पल्सर N125 इतर बाबी (Bajaj Pulsar N125)

बाईकला सिंगल-क्रेडल फ्रेम मिळते. बाईकमध्ये  बॅक सस्पेंशन मोनोशॉक आहेत. फ्रंट डिस्क 240mm आणि 130mm मागील ड्रम ब्रेक आहे. टायर प्रोफाईलबद्दल विचार केल्यास, आम्हाला समोर 80/100-17 आणि मागील बाजूस 100/90-17 या आकाराचे टायर मिळतात. पलसर एन 125 च्या टॉप व्हेरियंटचा विचार केल्यास, ब्लूटूथ व्हेरियंटला मागील बाजूस 110/80-17 टायर मिळतो. टाकीची क्षमता 9.5-लिटर आहे आणि Pulsar N125 चे वजन 125kg आहे. बाईकच्या सीटची उंची 795mm आहे. ग्राउंड क्लीयरन्स 198 मिमी आहे आणि एक्झॉस्ट अंडरबेली आहे.वैशिष्ट्यांचा विचार केल्यास, मोटरसायकलला बेसिक ब्लूटूथ एलसीडी डिस्प्लेसह एलईडी हेडलाइट मिळतो. टॉप व्हेरियंटला खूप मोठा डॅश आणि एक जाड रियर टायर मिळतो. स्प्लिट सीट कॉन्फिगरेशन मिळते.

हे देखील वाचा-Jeep Meridian facelift मॉडेलचे लॉंचिंग ! जुन्या मॉडेलपेक्षा किंमत तब्बल 6.24 लाख रुपयांनी कमी

बजाज पल्सर N125 रंग पर्याय (Bajaj Pulsar N125)

बजाज पल्सर N125 ही चार  रंग पर्यायामध्ये उपलब्ध आहे – त्यामध्ये पांढरा, काळा, लाल आणि निळा या रंगांचा समावेश आहे. तर, ब्लूटूथ प्रकारामध्ये तीन ड्युअल-टोन पर्याय मिळतात- ज्यामध्ये काळा/लाल, काळा/पिवळा आणि काळा/जांभळा यांचा समावेश आहे.

बजाज पल्सर N125 पलसर बाईकमध्ये एक नवे एडिशन लॉंच झाले आहेच त्याशिवाय या प्रकारामध्ये ग्राहकांना नवीन बाईक पर्याय उपलब्ध झाला आहे.

Web Title: New edition launch of pulsar from bajaj during the festive season know the features price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 09:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.