फोटो सौजन्य: Social Media
हल्ली आपल्याकडे अनेक कार्स लाँच होताना दिसतात. ज्याप्रमाणे या कार मार्केटमध्ये येतात त्याचप्रमाणे ग्राहकांच्या विस्मरणात सुद्धा जातात. पण अशा ही काही कार्स मार्केटमध्ये आहेत ज्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरातील ग्राहकांच्या मनात घर करून आहेत.
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, जिच्या अनेक कार्स देशात लोकप्रिय आहेत. यातीलच एका कारची मागणी सध्या सातासमुद्रापार पहायला मिळत आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही एसयूव्ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीजपैकी एक आहे, ज्याने आता निर्यातीतही आपला ठसा उमटवला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये या कारच्या विक्रीत 355 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने या कालावधीत एसयूव्हीच्या एकूण 5 हजार 200 युनिट्सची निर्यात केली आहे.
हे देखील वाचा: एका सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी ‘हे’ गॅजेट्स तुमच्याकडे असायलाच हवे
निर्यातीच्या बाबतीत मारुतीची ही कार निसान सनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच्या फक्त एक वर्षापूर्वी मारुतीच्या या कारला परदेशात एकूण 1 हजार 143 नवीन ग्राहक मिळाले होते. किफायतशीर असण्यासोबतच, मारुती सुझुकी फ्रंटला त्याच्या उत्कृष्ट फीचर्ससाठी देखील ओळखली जाते.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची एक्स-शोरूम किंमत 7,51,000 रुपयांपासून सुरू होते. देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये या व्हेरियंटची ऑन-रोड किंमत 8,42,167 रुपये आहे. जर तुम्ही रोख पैसे देऊन ही कार खरेदी केली तर तुम्हाला 8.42 लाख रुपये द्यावे लागतील. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
फ्रॉन्क्सच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात हेड-अप डिस्प्ले आहे. या कारचे इंटिरिअर ड्युअल टोन प्लशमध्ये देण्यात आले आहे. फ्रंटमध्ये 360-डिग्री कॅमेराचे फिचर देखील समाविष्ट आहे. तसेच यात ARKAMYS कडून 9-इंच स्मार्टप्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. वायरलेस चार्जरने मोबाईल फोन चार्ज करण्याची सुविधाही कारमध्ये देण्यात आली आहे.
मारुती सुझुकी फ्रंट्समध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटीचे वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाहनापासून दूर असतानाही तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळू शकतात. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींमध्ये कनेक्ट केले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या कारशी रिमोट ऑपरेशन्सद्वारे देखील कनेक्ट राहू शकता. या कारमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग आणि सेफ्टीशी संबंधित अनेक फिचर्सचाही समावेश आहे. आता त्याच्या डेल्टा+ (O) प्रकारात 6 एअरबॅगचे वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे.