फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातील लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या TVS मोटरने निओ-रेट्रो बाईक Ronin 2025 एडिशन आपल्या फ्लॅगशिप वार्षिक बाइकिंग इव्हेंट, Motosoul 4.0 मध्ये सादर केली आहे. कंपनीने या नवीन अपडेटेड बाईकमध्ये अनेक खास बदल केले आहेत. सुरक्षेला महत्व देत यात ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) दिली गेली आहे. तसेच बाईकच्या डिझाईनमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्सही करण्यात आले आहेत. या अपडेट्समुळे बाईक अधिक आकर्षक बनली आहे.
TVS Ronin च्या या नवीन एडीशनमध्ये, ग्राहकांना दोन नवीन रंग पर्याय मिळणार आहेत – ग्लेशियर सिल्व्हर आणि चारकोल एम्बर. हे नवीन रंग अगोदरच्या डेल्टा ब्लू आणि स्टारगेझ ब्लॅक रंगांना पर्याय ठरणार आहेत. याशिवाय बाईकमध्ये मॅग्मा रेड, गॅलेक्टिक ग्रे, डॉन ऑरेंज, निंबस ग्रे आणि मिडनाईट ब्लू सारखे इतर रंग पर्याय देखील उपलब्ध असतील.
TVS कडून माहिती देण्यात आली आहे की, अपडेटेड रोनिन बाईक ही जानेवारी 2025 मध्ये लॉंच होणार आहे. ही बाईक कावासाकी W175 आणि रॉयल एनफिल्ड हंटर 350 आदी निओ-रेट्रो बाईकशी स्पर्धा करणार आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ही बाईक बुक करू शकतात.
नवीन एडिशनमध्ये केलेले बदल
नवीन एडिशनमध्ये केलेले बदल मुख्यत्वे Ronin DS च्या मिड व्हेरियंटमध्ये आहेत, तर बेस व्हेरियंट (SS) आणि टॉप व्हेरियंट (TD) मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ग्लेशियर सिल्व्हर कलरला ड्युअल-टोन गडद राखाडी आणि सिल्व्हर पेंट स्कीम मिळते, जी इंधन टाकीवर पिवळे पट्टे आणि ग्राफिक्सने सजलेली असते. दुसरीकडे, चारकोल एम्बर रंग, इंधन टाकीभोवती जोडलेल्या लाल ग्राफिक्ससह ड्युअल-टोन हलका राखाडी आणि गडद निळा स्कीम मिळवतो.
या बाइकमध्ये एलईडी हेडलाइटच्या वर एक ब्लॅक-आउट फ्लाय स्क्रीन देखील जोडली गेली आहे. जी बाईकचे दृश्य आकर्षण वाढवतेच पण हेडविंड्स डिफ्लेक्ट करते . बाईच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास लांब स्मोक्ड व्हिझर, थ्रॉटल बॉडी कव्हर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि पूर्णपणे ब्लॅक इंजिन केस, फेंडर आणि एक्झॉस्ट इत्यादीचा समावेश आहे.
टीव्हीएस रोनिन इंजिंन
बाईक मध्ये 225.9cc एअर आणि ऑइल-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 20.1hp पॉवर आणि 19.93Nm टॉर्कची निर्मिती करते. स्लिप आणि असिस्ट क्लचसह इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच बाईकमध्ये ॲडजस्टेबल लीव्हर आणि दोन ABS मोड – अर्बन आणि रेन देखील दिलेले आहेत, ज्यामुळे बाईक कोणत्याही रस्त्यांवर चालवण्यास योग्य ठरते.
टीव्हीएस रोनिन बाईकची एक्स शोरुम किंमत सध्या जवळपास 1 लाख 35 हजार इतकी आहे. आता या एडिशनची किंमत काय असेल हे लवकरच कळेल.