फोटो सौजन्य: Social Media
भारतात बाईकप्रेमींची संख्या काही कमी नाही. त्यातही आजच्या बाईक खरेदीदाराला आपली बाईक स्टायलिश आणि आकर्षक हवी. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या नेहमीच आपल्या बाईकचे डिझाइन स्टायलिश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. यातही काही बाईक उत्पादक कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या बाईक्सची क्रेझ आजही कायम आहे. यातीलच एक मोठे नाव म्हणजे रॉयल एन्फिल्ड.
नुकतेच रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतात लाँच करण्यात आली आहे. या बाईकमध्ये पूर्वीपेक्षा मोठे इंजिन, नवीन डिझाइन, नवीन हेडलाइट आणि नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे. यासोबतच बाईकमध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० मध्ये कोणत्या नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे, त्याबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी या बाईकची किंमत सुद्धा जाणून घेऊया.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० ही दोन व्हेरियंटमध्ये आणण्यात आली आहे, ती म्हणजे ट्रेल आणि फोर्स. त्याच्या ट्रेल व्हेरियंटमध्ये स्पोक व्हील्स आणि ट्यूब टायर्स आहेत, तर फोर्स व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स वापरण्यात आले आहेत. ही बाईक ५ रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० ट्रेल (निळा आणि हिरवा) – २.०८ लाख रुपये (एक्स-शोरूम)
रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० फोर्स (निळा, राखाडी आणि हिरवट निळा) – २.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम)
भारतीय बाजारपेठेत, नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 ही नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅमब्लर ४००एक्स आणि येझदी स्क्रॅमब्लरशी स्पर्धा करेल.
नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० चा आकार रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ सारखाच आहे. यात पूर्णपणे नवीन एलईडी हेडलाइट, मोठी इंधन टाकी, नवीन सीट आणि बदललेला टेल सेक्शन आहे, ज्यामुळे ही बाईक पूर्वीपेक्षा अधिक बारीक दिसते.
या बाईकमध्ये ४४३ सीसी, एअर आणि ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे २५.४ पीएस पॉवर आणि ३४ एनएम टॉर्क (पूर्वीपेक्षा १.१ पीएस आणि २ एनएम जास्त) निर्माण करते. त्याचे इंजिन ६-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, तर मागील मॉडेलमध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४४० ची खालील वैशिष्ट्ये:
नवीन स्क्रॅम ४४० मध्ये १९० मिमी व्हील ट्रॅव्हलसह ४१ मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि १८० मिमी व्हील ट्रॅव्हलसह मोनोशॉक सस्पेंशन आहे. त्याच्या पुढच्या बाजूला ३०० मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला २४० मिमी डिस्क ब्रेक आहे. यात ड्युअल-चॅनेल ABS देखील आहे. या बाईकमध्ये १९-इंच फ्रंट आणि १७-इंच रिअर व्हील्स आहेत, ज्यामध्ये १०० सेक्शन फ्रंट आणि १२० सेक्शन रिअर ब्लॉक पॅटर्न टायर्स वापरण्यात आले आहेत. त्याच्या ट्रेल व्हेरियंटमध्ये स्पोक व्हील्स आणि ट्यूब टायर्स बसवण्यात आले आहेत. त्याची इंधन टाकीची क्षमता १५ लिटर आहे.