फोटो सौजन्य; Social Media
दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. या सणासुदीच्या काळात अनेक ऑटो कंपनीज नवीन बाईक किंवा कार लाँच करत असतात. तसेच आकर्षक ऑफर्स सुद्धा या काळात पाहायला मिळतात, ज्यामुळे नवीन वाहन घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड झुंबड पाहायला मिळते.
टीव्हीएस कंपनी ही देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी आहे जी अनेक वर्षांपासून दर्जेदार बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत आहे. TVS Raider 125 ही कंपनीच्या अनेक लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे, जी तिच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. नुकतेच कंपनीने या 125 cc बाईकचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने या बाईकमध्ये कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान आणले आहे? यात कोणते फीचर्स आहेत? या बाइकची किंमत काय असू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.
हे देखील वाचा: ‘ही’ 4 कामं कराल तर नाही होणार कारमधून Pollution, वाढेल इंजिनचे आयुष्य
कंपनीने नवीन तंत्रज्ञानासह टीव्हीएस रायडर लाँच केली आहे. त्यानंतर ही बाईक आपल्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान बाईक बनली आहे. TVS ने 10 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने हे नवीन व्हर्जन लाँच केले आहे.
TVS ने Raider 125 मध्ये iGO तंत्रज्ञान दिले आहे. कंपनीच्या मते, iGO असिस्ट रायडरला बूस्ट मोड, फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर्ससह केवळ 5.8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग वाढविण्यास सक्षम करते. याव्यतिरिक्त या बाईकच्या इंधन कार्यक्षमतेत 10 टक्के सुधारणा झाली आहे.
कंपनीने यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स दिले आहेत. बाईकच्या नवीन व्हर्जनमध्ये TVS SmartXonnect™ तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्याला व्हॉईस असिस्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारख्या 85 पेक्षा जास्त ब्लूटूथ कनेक्ट केलेल्या फीचर्ससह नवीन रिव्हर्स एलसीडी क्लस्टर मिळतो. राईड रिपोर्ट आणि मल्टिपल राइडिंग मोड्स सारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. बाईकला 5-स्टेप ॲडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन, लो फ्रिक्शन फ्रंट सस्पेन्शन आणि स्प्लिट सीट देखील मिळते.
कंपनीने या नवीन बाईकचे व्हर्जन 98389 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केले आहे. बाजारात त्याची थेट स्पर्धा नुकत्याच लाँच झालेल्या बजाज पल्सर N125, Hero Xtreme 125, Honda Shine 125, SP125 यांसारख्या बाईक्ससोबत असेल.