बाईकच्या किमतीत होणान नव्या वर्षात वाढ
इलेक्ट्रिक मोटारसायकल उत्पादक कंपनी अल्ट्राव्हायोलेटने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे आणि आपल्या फ्लॅगशिप बाईक Ultraviolette F77 MACH 2 च्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या वाढलेल्या किमती पुढील वर्षी जानेवारीपासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक बाइक सध्याच्या किमतीत खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे डिसेंबरपर्यंत वेळ आहे.
कंपनीने सांगितले आहे की Ultraviolette F77 MACH ची प्रारंभिक किंमत 2.99 लाख रुपये राहील, परंतु त्याच्या काही निवडक मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या जातील. यासोबतच कंपनीने मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 5% पर्यंत सूट दिली आहे (फोटो सौजन्य – Bikewale)
का केली किमतीत वाढ
इनपुट खर्चात वाढ आणि बाजारातील बदलत्या ट्रेंडमुळे अल्ट्राव्हायोलेटने हा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने F77 MACH 2 आणि MACH 2 रिकॉन व्हेरियंटवर 14,000 रुपयांपर्यंतचा वर्षअखेरीचा लाभ जाहीर केला आहे, जो मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल.
eVitara SUV: लवकरच लाँच होतेय मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार, काय आहे किंमत आणि Features
काय आहे वैशिष्ट्य
या इलेक्ट्रिक बाईकची कामगिरी हे तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 ची पॉवरट्रेन 40.2 एचपीची कमाल पॉवर आणि 100 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. ही बाईक फक्त 2.8 सेकंदात 0-60 किमी/ताशी वेग पकडू शकते. यात 10.3 kWh बॅटरी आहे, जी एका चार्जवर 323 किमी पर्यंतची रेंज देते.
फीचर्सच्या बाबतीत ही बाईक खूप प्रगत आहे. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मल्टिपल रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम यासह अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. अल्ट्राव्हायोलेटचा दावा आहे की ही बाईक अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उत्कृष्ट राइडिंग अनुभव देते.
सुरुवातीची किंमत
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक अल्ट्राव्हायोलेटने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल F77 भारतीय बाजारपेठेत 3.8 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली होती. अल्ट्राव्हायोलेटने F77 ही हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून सादर केली आहे. कंपनीला जागतिक स्तरावर या मोटरसायकलसाठी 77,000 हूनपेक्षा अधिक बुकिंग मिळाले होते.
Electric Scooter खरेदी करण्याचा प्लॅन असेल, Bajaj लाँच करत आहे नवी Chetak E-Scooter, पहा नवे व्हर्जन
लिमिटेड एडिशन
विशेष म्हणजे, अल्ट्राव्हायोलेटने घोषणा केली होती की ते F77 ची मर्यादित आवृत्ती देखील देत आहेत. ही मर्यादित आवृत्ती तिच्या भविष्य-केंद्रित दृष्टीकोनासाठी होती. कंपनी लिमिटेड एडिशन F77 च्या फक्त 77 युनिट्सचे उत्पादन करेल असेही सांगण्यात आले होते. लिमिटेड एडिशन अल्ट्राव्हायोलेट F77 40.5 bhp आणि 100 Nm टॉर्क जनरेट करते आणि केवळ 7.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि त्याचा सर्वोच्च वेग 158 किमी प्रतितास आहे. हे F77 आफ्टरबर्नर यलोसह मेटिअर ग्रे रंगाच्या सिंगल कलर स्कीममध्ये ऑफर केले जाईल असेही सांगण्यात आले होते.