फोटो सौजन्य - Social Media
ओबेन इलेक्ट्रिकने दसरा सणाच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. भारतातील अग्रगण्य स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या ओबेन इलेक्ट्रिकने दसरा उत्सवाच्या कालावधीत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत करण्याची संधी दिली आहे. कंपनीची फ्लॅगशिप परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटारसायकल ओबेन रोर आता आकर्षक सवलतीत उपलब्ध होणार आहे.
ओबेन रोर या मोटारसायकलची मूळ एक्स-शोरूम किंमत ₹१,४९,९९९ आहे, पण दसरा ऑफर अंतर्गत ही मोटारसायकल आता केवळ ₹१,१९,९९९ रुपयांत खरेदी करता येईल. यामुळे ग्राहकांना तब्बल ₹३०,००० रुपयांची बचत होईल. यासोबतच ग्राहकांना ५ वर्षांची वाढीव वॉरंटी आणि आयफोन १५, आयपॅड मिनी, तसेच सोनी हेडफोन जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे.
हे देखील वाचा : लक्झरी कारची लक्झरी किंमत! Rolls Royce Cullinan facelift भारतात झाली लाँच
कंपनीने बेंगळुरू, दिल्ली, आणि पुणे येथे दसरा धमाल दिवस आयोजित केले आहेत. या एका दिवसाच्या विशेष कार्यक्रमादरम्यान, ग्राहकांना ओबेन रोरवर एकूण ₹६०,००० रुपयांपर्यंतची बचत करण्याची सुवर्णसंधी मिळेल. यामुळे ओबेन रोरची किंमत फक्त ₹८९,९९९ इतकी कमी होईल. या कार्यक्रमाचे आयोजन बेंगळुरू येथे २९ सप्टेंबर रोजी, दिल्ली येथे २ ऑक्टोबर रोजी, आणि पुणे येथे ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. पुण्यातील कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून अभिनेता आणि बिग बॉस मराठी ४ चे विजेते अक्षय केळकर उपस्थित राहणार आहेत.
ओबेन इलेक्ट्रिकच्या सीईओ मधुमिता अग्रवाल यांनी या ऑफरबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांच्या मते, “दसरा हा उत्सव आनंदाचा असतो आणि आम्हाला आमच्या ग्राहकांसोबत हा आनंद साजरा करायचा आहे. ओबेन रोर ही मोटारसायकल कामगिरी, सुरक्षितता, आणि टिकाऊपणाच्या बाबतीत एक उत्कृष्ट पर्याय आहे. सणाच्या या काळात आम्ही अधिकाधिक ग्राहकांना ओबेनच्या नाविन्यपूर्ण ईव्ही मोटरसायकलचा अनुभव घेण्याची संधी देऊ इच्छितो.”
हे देखील वाचा : फेस्टिव्ह सीजन गाजवायला सज्ज आहेत ‘या’ प्रीमियम कार्स, लवकरच होणार लाँच
ओबेन इलेक्ट्रिकने सणासुदीच्या या ऑफरबरोबरच आपल्या विस्तार योजनांची देखील घोषणा केली आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत भारतातील प्रमुख शहरांमध्ये ६० नवीन शोरूम्स उघडणार आहे. बेंगळुरू, पुणे, दिल्ली, आणि केरळमध्ये सध्या ओबेन इलेक्ट्रिकची उपस्थिती आहे. कंपनीच्या एलएफपी बॅटरी तंत्रज्ञानामुळे, ओबेन रोर ही मोटारसायकल ५०% जास्त उष्णतारोधक आणि दीर्घकालीन आयुष्य प्रदान करते, ज्यामुळे ही इतर स्पर्धक उत्पादनेपेक्षा वेगळी ठरते.
ही दसरा ऑफर इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी एक उत्तम संधी ठरत असून, भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. ओबेन इलेक्ट्रिकने या सवलतींद्वारे आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट कामगिरी आणि टिकाऊपणाचे वचन दिले आहे.