फोटो सौजन्य:YouTube
भारतात आपल्याला नेहमीपासूनच लक्झरी कार्सबद्दलची उत्सुकता पाहायला मिळते. आजही रस्त्यावर एखादी लक्झरी कार दिसली की कित्येक जण तिच्याकडे टक लावून पाहत असतात. एवढेच काय, जर एखादी लक्झरी कार एका कडेला पार्क असेल तर तिच्याभवती लगेच अनेक जण फोटो काढण्यासाठी जमा होत असतात. या क्रेजमुळेच अनेक लक्झरी कार कंपनीज भारतात लक्झरी कार्स लाँच करत असतात.
नुकतेच Rolls Royce ने Cullinan फेसलिफ्ट भारतात लाँच केली आहे. ही एक अपडेटेड SUV आहे, जी Cullinan Series II म्हणून ओळखली जाते. ही कार मे 2024 मध्ये जागतिक स्तरावर लाँच केली गेली होती. आता नुकतेच या कारने भारतात प्रवेश केला आहे. यात नवीन अपडेटेड इंटीरियर आणि तंत्रज्ञान देण्यात आले आहे. चला जाणून घेऊया, ही लक्झरी कार कोणत्या फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: परतीच्या पावसामुळे तुमच्या कारमधील इंटिरिअरची लागू शकते वाट, आजच टाळा ‘या’ चुका
Cullinan Series II च्या बाहेरील भागात L-आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्स असलेले स्लिम हेडलॅम्प आहेत, जे बंपरपर्यंत वाढतात. याच्या ग्रिलला नवीन डिझाईन देण्यात आले आहे. त्याच्या मागील बंपरला स्टेनलेस-स्टील स्किड प्लेटसह नवीन रूप देण्यात आले आहे. या कारची अलॉय व्हील्सही नवीन देण्यात आली आहेत.
या कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर डॅशबोर्डवर काचेचे पॅनेल देण्यात आले आहे. डॅशमध्ये एक नवीन डिस्प्ले कॅबिनेट देखील आहे, ज्यामध्ये ॲनालॉग घड्याळ आणि त्याच्या खाली एक लहान स्पिरिट ऑफ एक्स्टसी आहे. हा स्पिरिट इन्फोटेनमेंट सिस्टमच्या नवीनतम प्रकारासह येते, ज्यामध्ये नवीन ग्राफिक्स आणि डिस्प्ले पाहायला मिळतात. त्याचे खरेदीदार त्यांच्या आवडीनुसार पेंटवर्क बदलू शकतात.
हे देखील वाचा: फेस्टिव्ह सीजन गाजवायला सज्ज आहेत ‘या’ प्रीमियम कार्स, लवकरच होणार लाँच
Rolls Royce Cullinan facelift या कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 10.50 कोटी रुपये आहे. तसेच, ब्लॅक बॅज व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 12.25 कोटी रुपये आहे. अपडेटेड Cullinan ची एक्स-शोरूम किंमत सध्याच्या प्री-फेसलिफ्ट Cullinan (रु. 6.95 कोटी) पेक्षा सुमारे 3.55 कोटी अधिक आहे आणि नवीन ब्लॅक बॅजची एक्स-शोरूम किंमत त्याच्या आधीच्या (8.20 कोटी रूपये) पेक्षा 4.05 कोटी अधिक आहे. भारतात Cullinan Series II ची डिलिव्हरी या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून सुरू होऊ शकते.