फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात इलेक्ट्रिक वाहनं खूप मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींना कंटाळल्यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पाहिजे प्राधान्य देत आहे. तसे बघता, येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटोमोबाईल कंपनीज सध्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कुटर्सच्या उत्पादनावर काम करत आहे.
भारतात वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटच्या विक्रीतही सातत्याने वाढ होत आहे. फाडा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने एक अहवाल जरी केला आहे. यात इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या विक्रीबाबतचे आकडे नमूद करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या इलेक्ट्रिक स्कुटरची सर्वाधिक विक्री झाली आहे.
FADA ने जारी केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटच्या 88472 युनिट्सची विक्री झाली आहे. अहवालानुसार, यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 62779 युनिट्सची विक्री झाली होती. अहवालानुसार, मासिक आधारावर यात घट झाली आहे, तर वार्षिक आधारावर या विभागात वाढ नोंदवली गेली आहे.
देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Ola Electric ने ऑगस्ट 2024 मध्ये सर्वाधिक स्कुटर्स विकल्या आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 27517 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने केवळ 18750 मोटारींची विक्री केली होती. मात्र, जुलै 2024 मध्ये कंपनीने 41624 युनिटची विक्रमी विक्री केली होती.
TVS द्वारे इलेक्ट्रिक स्कुटरच्या सेगमेंटमध्ये iQube सिरीज ऑफर केली जाते. विक्रीच्या बाबतीत टीव्हीएस क्रमांक 2 वर राहिला आहे. मासिक आधारावर कंपनीने सुमारे 10 टक्के घट नोंदवली आहे. परंतु कंपनीला वार्षिक आधारावर 13 टक्क्यांहून अधिक वाढ मिळाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीच्या स्कुटर्सची एकूण 17543 युनिट्सची विक्री झाली आहे. तर यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये कंपनीने 15482 युनिट्सची विक्री केली होती. जुलै 2024 मध्ये विक्रीचा आकडा 19486 युनिट्स होता.
चेतक देखील बजाजने इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये एकूण 16706 युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑगस्ट 2023 मध्ये 6590 युनिट्सची विक्री झाली.
बेंगळुरू-आधारित स्टार्टअप अथरने गेल्या महिन्यात देशभरात 10830 युनिट्सची विक्री केली आहे. तर ऑगस्ट 2023 मध्ये ही संख्या 7157 युनिट्स होती.
हिरो मोटोकॉर्प पाचव्या क्रमांकावर आहे. कंपनीने मासिक आधारावर आपल्या विक्रीत घट नोंदवली आहे तर वार्षिक आधारावर त्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये 4742 युनिट्सची विक्री केली होती. तर मागील वर्षी याच कालावधीमध्ये केवळ 915 युनिट्सची विक्री झाली होती. तर जुलै 2024 मध्ये ही संख्या 5045 युनिट होती.