फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईलक्षेत्र हे एवढं मोठं आहे की प्रत्येक कार उत्पादक कंपनी त्यात आपला दबदबा निर्माण करायचा प्रयत्न करत असते. बदलत्या काळानुसार भारतीय ग्राहकांच्या आपल्या कारकडून असणाऱ्या अपेक्षा सुद्धा बदलत आहे. पूर्वी कार घेताना फक्त मायलेज या एकच गोष्टीवर लक्षकेंद्रित केले जायचे. पण आज मायलेजबरोबरच कारचे अन्य फीचर्स सुद्धा तितकेच महत्वाचे झाले आहे.
कार घेताना हल्ली तिचा रायडींग अनुभव सुद्धा खूप महत्वाचा झाला आहे. काही जणांना आरामदायी रायडिंग करायला आवडते तर काही जणांना थ्रिलींग राइड करायला आवडते. ज्यांना थरारक रायडींगचा अनुभव घ्यायला आवडते त्यांच्यासाठी ह्युंदाई कंपनीने एका नवीन एडिशनमध्ये कार लाँच केली आहे.
कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai द्वारे ऑफर केलेल्या व्हेन्यूची नवीन व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. चला या नवीन कारबद्दल अधिक जाणून घेऊया.
Hyundai द्वारे Venue Adventure Edition भारतात लाँच करण्यात आली आहे. सणासुदीच्या आधी लाँच झालेल्या या एडिशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हे एडिशन खास अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे ज्यांना रायडींगमध्ये थरारक आणि आउटडोर अनुभव आवडतात.
हे देखील वाचा: स्टयलिश लूक असणारी बाईक शोधताय? Yamaha कडून नवीन एडिशन मध्ये R15 आणि MT-15 लाँच
कंपनीकडून व्हेन्यूच्या ॲडव्हेंचर एडिशनमध्ये समोर लाल रंगाचे ब्रेक कॅलिपर, पुढील आणि मागील बाजूस काळ्या रंगाच्या स्किड प्लेट्स, काळ्या रंगाचे छत, ORVMs आणि शार्क फिन अँटेना, डोअर क्लॅडिंग देण्यात आले आहे. कारच्या आतील भागात लाइट सेज ग्रीन इन्सर्टसह काळे एसेंट्स देखील आहेत. या थीमवर ॲडव्हेंचर एडिशन सीट्स ठेवण्यात आल्या आहेत. SUV मध्ये मेटल पेडल्स, 3D मॅट आणि ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम देखील आहे.
Hyundai ने Adventure Edition Venue मध्ये दोन इंजिनांसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ऑप्शन्स दिले आहेत. यात मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. तर एक लिटर पेट्रोल इंजिनमध्ये टर्बो आणि डीसीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
नवीन एडिशन कंपनीने एस ऑप्शनल प्लस, एसएक्स आणि एसएक्स ऑप्शनल या ऑप्शन्समध्ये आणले आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 10.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.38 लाख रुपये आहे. जर तुम्हाला एसएक्स आणि एसएक्स ऑप्शनल ट्रिममध्ये ड्युअल टोनचा पर्याय हवा असेल, तर अतिरिक्त 15,000 रुपये द्यावे लागेल.