

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 तीन व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाली आहे.
743 सीसी पॅरलल ट्विन इंजिन तिन्ही व्हेरिएंटमध्ये समान देण्यात आले आहे.
टॉप व्हेरिएंटमध्ये GIVI टूरिंग अॅक्सेसरीज आणि हार्ड पॅनियर्स मिळतात.
रॉयल एनफिल्डने गोव्यात आयोजित Motoverse 2026 कार्यक्रमात आपली नवीन Himalayan 750 ही अॅडव्हेंचर मोटरसायकल लाँच केली आहे. कंपनीची ही पहिली 750 सीसी अॅडव्हेंचर बाईक आहे. या मोटरसायकलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4,89,490 रुपये असून टॉप व्हेरिएंटसाठी 6,29,000 रुपये मोजावे लागतील. कंपनीने ही बाईक 3 व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. विशेष म्हणजे, तिन्ही व्हेरिएंटमध्ये इंजिन आणि मेकॅनिकल सेटअप समान आहे. पण व्हील्स, कलर आणि टूरिंग अॅक्सेसरीजमध्ये फरक देण्यात आला आहे.
1. हिमालयन 750 कास्ट अलॉय – 4,89,490 रुपये
हा बेस व्हेरिएंट असून यामध्ये कास्ट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. अझटेक ग्रीन आणि टेक्टॉनिक ब्लॅक असे 2 कलर ऑप्शन मिळतात. यामध्ये CEAT Crossrad AT टायर्स दिले आहेत. शहरातील प्रवास, हायवे राइडिंग आणि अधूनमधून खराब रस्त्यांवर प्रवास करणाऱ्यांसाठी हा व्हेरिएंट योग्य ठरू शकतो.
2. हिमालयन 750 ट्यूबलेस स्पोक – 5,14,495 रुपये
मिड व्हेरिएंटमध्ये ट्यूबलेस क्रॉस-स्पोक व्हील्स मिळतात. यासाठी वायकिंग ब्रॉन्झ आणि सायबेरिया व्हाइट असे 2 कलर ऑप्शन आहेत. यामध्ये Vredestein Centauro XR टायर्स देण्यात आले आहेत. बेस व्हेरिएंटपेक्षा याची किंमत 25,005 रुपये जास्त आहे. लांबच्या प्रवासासाठी आणि वेगवेगळ्या रस्त्यांवर राइडिंग करणाऱ्यांना हा व्हेरिएंट उपयोगी ठरू शकतो.
3. हिमालयन 750 GIVI टूरिंग एडिशन – 6,29,000 रुपये
टॉप व्हेरिएंटमध्ये अंटार्क्टिक सिल्व्हर कलर देण्यात आला आहे. इटालियन कंपनी GIVI सोबत तयार केलेल्या टूरिंग पॅकेजमध्ये टॉप बॉक्स, हार्ड पॅनियर्स आणि माउंटिंग हार्डवेअर मिळते. याशिवाय हीटेड ग्रिप्स, हँडगार्ड्स आणि अॅल्युमिनियम स्किड प्लेटही देण्यात आली आहे. या व्हेरिएंटची किंमत मिड व्हेरिएंटपेक्षा 1,14,505 रुपये जास्त आहे.
तिन्ही व्हेरिएंटमध्ये समान इंजिन आणि हार्डवेअर
हिमालयन 750 मध्ये 743 सीसी एअर/ऑइल-कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 7,000 rpm वर 55 hp पॉवर आणि 5,000 rpm वर 63 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-अँड-स्लिपर क्लच मिळतो. बाईकमध्ये 43 मिमी अॅडजस्टेबल शोवा USD फ्रंट फोर्क, मागील बाजूला शोवा मोनोशॉक, 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर व्हील्स तसेच 17.8 लिटरची फ्युल टँक आहे.
रॉयल एनफिल्डने 28 नोव्हेंबरपासून Motoverse मध्ये सहभागी झालेल्यांसाठी बुकिंग सुरू केले आहे. देशभरातील बुकिंग 1 डिसेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. सध्या जाहीर केलेल्या किमती इंट्रोडक्टरी आहेत. डिलिव्हरीची तारीख कंपनीने सांगितलेली नाही.