फोटो सौजन्य: YouTube
भारतात बुलेट प्रेमींची काही कमी नाही. आज चौका चौकात आपल्याला बुलेट पाहायला मिळते. कित्येक तरुण आजही आपली पहिली बाइक म्हणून बुलेटला प्राधान्य देत असतात. याच ग्राहकांच्या जबरदस्त मागणीमुळे रॉयल एन्फिल्ड नेहमीच उत्तमोत्तम बाईक्स भारतीय बाजारात लाँच करत असतात. भारतीय सुद्धा त्यांच्या या नवीन बाईक्सला चांगलीच पसंती दर्शवतात. आता नुकतेच रॉयल एन्फिल्डने Classic 350 लाँच केली आहे.
ही नवीन बाईक लाँच होताच अनेक बुलेट प्रेमींमध्ये या बाईकबद्दल कमालीची उत्सुकता आहे. यात कोणते फीचर्स असतील? या बाईकची किमंत बजेटमध्ये असेल का? आणि अशा कैक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
रॉयल एनफिल्डने क्लासिक 350 भारतीय बाजारात लाँच केली असून बाईकच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. मात्र इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नवीन क्लासिक 350 मध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प आहे. याशिवाय नवीन टेललाइट आणि यूएसबी चार्जिंग पोर्टसह अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, सिंगल आणि ड्युअल चॅनल ABS, 6-स्टेप ॲडजस्टेबल शॉक अॅबसॉर्बर देण्यात आले आहे. बाईकमध्ये 18 आणि 19 इंच व्हील्स आहेत आणि अलॉय व्हील विशेष व्हेरियंटस देण्यात आले आहे.
याशिवाय बाइकमध्ये मद्रास रेड, जोधपूर ब्लू, मेडेलियन ब्रॉन्झ, कमांडो सँड, ग्रे आणि ब्लॅक विथ कॉपर हायलाइट, क्रोम आणि कॉपर आणि रीगल ग्रीन या नवीन कलर्सचा समावेश करण्यात आला आहे. हे हेरिटेज, हेरिटेज प्रीमियम, सिग्नल, डार्क आणि एमराल्ड व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे.
पूर्वीप्रमाणेच या बाईकमध्ये 349 cc J सीरीज इंजिन आहे. सिंगल सिलेंडर इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
कंपनीने या बाईकची एक्स-शोरूम किंमत 199500 रुपये ठेवली आहे. तर टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. क्लासिक 350 बाईकची स्पर्धा Honda CB 350, Jawa आणि Yazdi सारख्या बाईक्स सोबत होऊ शकते.