फोटो सौजन्य- iStock
मारुती सुझुकीच्या फ्रॉन्क्स ही कार फार कमी वेळात भारतातील एक यशस्वी कॉम्पॅक्ट एसयूव्ही बनली आहे. बलेनोवर आधारित असलेल्या एसयूव्हीने केवळ 10 महिन्यांत देशांतर्गत बाजारपेठेत 1 लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे. भारतीय ग्राहकांचा या कारला उदंड प्रतिसाद मिळत आहे हे या आकडेवारीमधून लक्षात येते. ही SUV कार कंपनीकडून केवळ भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली नसून आफ्रिका, लॅटिन अमेरिका या बाजारपेठांमध्ये निर्यात केली जात आहे. मारुतीच्या नव्या फ्रॉन्क्स फेसलिफ्ट मॉडेल संबंधी आलेल्या अहवालानुसार ही कार मजबूत हायब्रीड तंत्रज्ञान ऑफर करणार आहे.
फोटो सौजन्य- Official Website
Maruti Fronx लॉन्च झाल्यापासून, कारने देशांतर्गत तसेच निर्यात बाजारात 2 लाख युनिट विक्रीचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे ही कार बलेनोनंतर ही कार मारुती सुझुकीने देऊ केलेली दुसरी मॉडेल आहे जी जपानला निर्यात केली जात आहे. ही कॉम्पॅक्ट SUV भारतातील Hyundai Exter आणि Tata Punch शी स्पर्धा करत आहे.
मारुती सुझुकी कंपनी ग्रँड विटाराच्या यशानंतर, मजबूत हायब्रीड्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. फ्रॉन्क्स हायब्रीड कार ही हायब्रिड विभागात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Maruti Fronx Facelift लवकरच होणार लॉंच
Maruti Fronx Facelift ही 2025 मध्ये लॉंच होणार आहे. या कारमध्ये नवीन स्विफ्टमध्ये असलेले Z12E इंजिनचा वापर केला जाणार आहे. यामुळे बलेनोच्या पुढील पिढीमध्ये अपडेटेड प्रणाली पुढे नेण्याची अपेक्षा आहे. कारची इंधन कार्यक्षमता 35 kmpl पेक्षा जास्त असू शकते. या एसयूव्हीच्या कारच्या इंटिरिअरमध्ये तसेच डिझाइनच्या बाबतीत मात्र किरकोळ बदल करण्यात येणार आहेत.
मारुती फ्रॉन्क्स दोन इंजिन पर्याय
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही कार सध्या दोन इंजिनमध्ये ऑफर केली जाते- 1.2 लिटर के-सीरीज ड्युअलजेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आणि 1.0-लिटर के-सीरीज टर्बो पेट्रोल इंजिन. 1.2 लीटर इंजिन 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 99bhp पॉवर आणि 147.6Nm टॉर्क उत्पन्न करते. 1.2 लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ट्रान्समिशनमध्ये दिले जाते, तर 1.0-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिकमध्ये दिले जाते.
स्वयंचलित हवामान नियंत्रण, पार्किंग सेन्सर्स ,प्रगत इंटरनेट वैशिष्ट्ये,मागील एसी व्हेंट्स,वायरलेस चार्जर ,समुद्रपर्यटन नियंत्रण यंत्रणा,360 डिग्री कॅमेरा, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट इत्यादी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या कारची एक्स शो रुम किंमत 8.71 लाख ते 15.24 लाख रुपये आहे.